Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट; जयतपाडमधील जलजीवन योजनेचे काम रखडले

दरवर्षी उन्हाळ्यात टँकरग्रस्त असलेल्या जयतपाड (ता. भोर) व परिसरातील वाड्यावस्त्यांसाठी मंजूर असलेल्या जलजीवन मिशन योजनेची मुदत संपूनही काम अपूर्णावस्थेत आहे.
Water Crisis
Water Crisissakal
Updated on

महुडे - दरवर्षी उन्हाळ्यात टँकरग्रस्त असलेल्या जयतपाड (ता. भोर) व परिसरातील वाड्यावस्त्यांसाठी मंजूर असलेल्या जलजीवन मिशन योजनेची मुदत संपूनही काम अपूर्णावस्थेत आहे. पाणी टंचाईचा सर्वात पहिला फटका येथील हुंबेवस्तीला बसला आहे.

येथील महिलांना लगतच्या विचारेवाडीतील जुन्या जलवाहिनीच्या नळावरून पाणी भरून आणावे लागत आहे. डोक्यावर हंडे घेत तब्बल २ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

जयतपाड ग्रामपंचायतीकडून हुंबेवस्तीसाठी पंचायत समितीकडे टँकरचा प्रस्ताव दिला असून तातडीने टँकर सुरु करण्याची मागणी सरपंच सुजाता तानाजी दिघे, बापू डोईफोडे, रामभाऊ हुंबे, बापूराव अहिरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

८१७ लोकसंख्या असलेल्या जयतपाड ग्रामपंचायतीमधील हुंबेवस्ती, रांजणवाडी, निवंगणी, ढाकवस्ती (गावढाण), विचारेवाडीसाठी जलजीवन मिशन योजनेतून १ कोटी ९ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या कामाची मुदत फेब्रुवारी २०२४ रोजी संपली आहे. परंतू काम अद्यापि पूर्ण नसून कामासंदर्भात संबंधित ठेकेदार ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे.

या योजनेतील विहीर, ३ एचपी पंपसेट, हुंबेवस्तीतील टाकीचे बांधकाम झाले आहे. मात्र हुंबेवस्ती, रांजणवाडी येथील जलवाहिनीची कामे अर्धवट आहेत. हुंबेवस्तीची लोकसंख्या ७२ इतकी असून येथील ग्रामस्थ व महिला वर्गाला गेल्या १०-१२ दिवसांपासून २ किलोमीटरवरून पायपीट करत पाणी आणावे लागत आहे.

यात काही वृद्ध महिलांना देखील आहेत. त्यांना काठीच्या आधाराने चढणीच्या वाटेने डोक्यावर हंडा घेत पाणी आणावे लागत आहे. यामध्ये त्यांच्या जिवितास देखील धोका होण्याची शक्यता आहे.

टँकर मंजूर होईपर्यंत ठेकेदाराने खासगी टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सरपंच सुजाता दिघे यांनी केली आहे. तर ठेकेदाराला काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना दिल्या असून ठेकेदाराला नोटीस बजावली असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com