बारामतीतील या कामामुळे पार्किंगची समस्या दूर 

मिलिंद संगई
Wednesday, 6 May 2020

पार्किंगच्या जागेत अतिक्रमण असल्याने लोकांना नाईलाजाने वाहने रस्त्यावर लावावी लागत होती

बारामती (पुणे) : शहरातील इंदापूर रस्त्यावरील पदपथाने अडचण होते, अशा तक्रारीनंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पदपथ आज जेसीबी लावून तोडून टाकला. त्यामुळे रस्त्यावर लागणारी वाहने आता पार्किंग क्षेत्रात लागली जातील व रस्ता वाहतुकीला खुला होईल. 

पुण्यातील दुकानांच्या वेळेसंदर्भात महत्त्वाची बातमी

बारामतीत गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर ते गुनवडी चौकादरम्यान पदपथामुळे दुचाकी वाहने रस्त्यावर लावायची वेळ नागरिकांना येत होती. पार्किंगच्या जागेत अतिक्रमण असल्याने लोकांना नाईलाजाने वाहने रस्त्यावर लावावी लागत होती. आता पदपथ काढून टाकल्याने वाहने पार्किंगच्या जागेत नेणे शक्य होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरचे दुचाकींचे पार्किंगही बंद होईल, अशी अपेक्षा आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

बारामती शहरातीस इंदापूर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्यावरील पदपथ काढून तेथे डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती अभियंता विश्वास ओहोळ यांनी दिली. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. दरम्यान, गणेश मार्केटवर प्रशस्त पार्किंग आहे, मात्र ते अडचणीचे आहे. त्यामुळे तेथे वाहने पार्क करण्यास कोणी तयार होत नाही, अशी स्थिती आहे. 

मिलिंद संगई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This work in Baramati eliminates the problem of parking