ऐन पावसाळ्यात मुळा-मुठा कालव्याच्या खचलेल्या भिंतीचे काम सुुरु

mula mutha canal.jpg
mula mutha canal.jpg

हडपसर (पुणे) : शिंदे वस्तीतून जाणाऱ्या नवीन मुळा-मुठा कालव्याची खचलेली भिंत बांधण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. याठिकाणी कालव्याकडेलाच मोठी लोकवस्ती आहे. कालवा खचल्यास मोठी दुर्घटना घडू नये यासाठी नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी पाटबंधारे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, अखेर या भिंतीचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सकाऴने देखील या प्रश्नाबाबत अनेकदा पाठपुरावा केला होता.

याबाबत नागरिक सविता जाधव म्हणाल्या, केवळ शिंदे वस्ती येथेच भिंत न बांधता परिसरात जागोजागी कालव्याची भिंत खचली आहे. त्याठिकाणी देखील नव्याने भिंत बांधावी. वानवडी ते हडपसर या दरम्यान मुठा कालव्याची संरक्षक भिंत अनेक ठिकाणी पडलेली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. शहरात कालव्याची भिंत खचल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे वानवडी ते हडपसर या दरम्यान तातडीने कालव्याच्या संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे.

शिंदे वस्तीतील रहिवाशी नागेश मोरे म्हणाले, शिंदे वस्ती येथे कालव्यास संरक्षक भिंत बांधण्यात येत असल्याने मोठी दुर्घटना टळणार आहे. याठिकाणी कालव्याला लागूनच झोपडया व घरे आहेत. तसेच कोणत्याही क्षणी कालवा फुटून दाट लोकवस्तीत पाणी शिरेल अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येथील रहीवाशांमध्ये भितीचे वातावरण होते.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता पोपटराव शेलार म्हणाले, शिंदेवस्ती येथे बांधण्यात येत असलेल्या भिंतीची लांबी 270 मिटर तर उंची पाच मिटर इतकी आहे. या कामासाठी 1 कोटी 18 लाख इतका खर्च येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्या टप्याने परिसरात ज्या -ज्या ठिकाणी भिंत खचली आहे, तेथे नव्याने भिंत बांधण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com