गुंजवणी पाईपलाईनच्या कामास वेल्ह्यात सुरुवात

मनोज कुंभार
Tuesday, 12 January 2021

 वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणाचे पाणी पुरंदरला बंद पाईपलाईनद्वारे नेण्यासाठी पाईपलाईनच्या
कामास गुंजवणी धरणाच्या दिशेने कामास सुरुवात झाली आहे.

वेल्हे, (पुणे) : वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणाचे पाणी पुरंदरला बंद पाईपलाईनद्वारे नेण्यासाठी पाईपलाईनच्या
कामास गुंजवणी धरणाच्या दिशेने कामास सुरुवात झाली आहे. बंद पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यास वेल्हेकरांचा विरोध आहे. तरी देखील पाईपलाईनच्या कामास सुरुवात केल्याने पुन्हा एकदा वेल्हेकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.

"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

गुंजवणी धरणातील पाणी पुरंदरला जाणार हे निश्चित झाले आहे. यासाठी शासनाने एल अॅन्ड टी कंपनीस कंत्राट दिले आहे. वेल्ह्यातील गुंजवणी धरणाच्या बाजूने पाईपलाईनच्या कामास नुकतीच सुरुवात झाली आहे. गुंजवणी संघर्ष समितीच्या माध्यमातून वेल्हे तालुक्याला गुंजवणीचे पाणी तसेच वाजेघर व वांगणी खो-यास उपसा सिंचन योजना करण्याची मागणी केली आहे.

याबाबतचा प्रस्ताव अजुनदेखील शासनदरबारी पडून आहे. त्यास मान्यता मिळालेली नाही. तसेच गुंजवणीच्या नदीच्या क्षेत्रात पाणी सोडणे तसेच पाणी तालुक्यातील शेतक-यांना कशा प्रकारे वाटप केले जाणार आहे, हे देखील कोणालाही माहीती नाही. शेतातून पाईप लाईनचे तरीदेखील गुंजवणी धरणाचे पुरंदरला
नेण्यासाठी अट्टाहास केला जात असून, (ता. १० जानेवारीपासून) प्रत्यक्षात पाईपलाईनच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
पाईपलाईनच्या कामासाठी १ ऑक्टोबर २०२० रोजी  वेल्ह्यात पाईप आणले जात होते.

यावेळी तालुक्यातील गुंजवणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी
यास विरोध करुन अस्कवडी या ठिकाणी पाईपलाईनसाठी आणलेले पाईपचे ट्रक अडविले होते. तर गेल्या दोन दिवसांपासून
पाईपलाईनच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. त्यामुळे वेल्हेकरांच्या तोंडाला पाने पुसली जाण्याची शक्यता आहे. याबाबत गुंजवणी संघर्ष समितीचे पदाधिकारी अमोल नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, ''पाईपलाईनच्या कामास आमचा विरोध असून, खासगी जागेतून आम्ही पाईपलाईनचे काम होऊ देणार नाही. गुंजवणी धरणासाठी आरक्षित जागेवर पाईपलाईनचे काम सुरु आहे त्यानंतरच्या कामास आमचा विरोध असणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाईपलाईनच्या कामास धरणासाठी आरक्षित केलेल्या जागेतुन करण्यात आलेली आहे. वाजेघर  व वांगणीसाठी उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी आहे. लवकरच त्यास मंजुरी मिळणार आहे. -संतोष डुबल, अभियंता गुंजवणी धरण 

वेल्हेकरांना गुंजवणी धरणातील पाणीवाटप कसे केले जाणार तसेच वाजेघर,वांगणी,रांजणे उपसा योजनेस मंजुरी अद्याप मिळाली नाही तसेच गुंजवणी नदीपात्रात देखील शेतक-यांना पाणी सोडण्याची तरतुद कश्या प्रकारे केली जाणार आहे.या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय पाईपलाईनच्या काम करु देणार नाही -दिनकर धरपाळे, अध्यक्ष गुंजवणी संघर्ष कृती समिती

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: work begins on the gunjwani pipeline in velha