फुलपाखरांच्या संवर्धनासाठी काम व्हावे

फुलपाखरांच्या मदतीने फळे व फळभाज्या पिकविण्यासाठी त्यांच्याकडून होणारे परागीभवन उपयोगी ठरते
फुलपाखरे
फुलपाखरेsakal

पुणे : ‘‘फुलपाखरे तसेच अन्य कीटक (butterflies and Insects) हे निसर्गातील परागीभवनातून नैसर्गिक परिसंस्थेचा समतोल राखण्यासह मानवी जीवनासाठी उपयुक्त कार्य करतात. त्यामुळे निसर्गाशी आपली नाळ जोडताना माणसाने फुलपाखरे (butterflies) आणि कीटकांची उपेक्षा न करता त्यांच्याही जतन-संवर्धनासाठी विशेष काम करायला हवे,’’ असे मत गरवारे महाविद्यालयात जैवविविधता विभागप्रमुख व जैवविविधता तज्ज्ञ डॉ. अंकुर पटवर्धन यांनी व्यक्त केले. ( Work for the conservation of butterflies)

जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून महर्षी स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए) वनजा व्यासपीठावरील ३२व्या सत्रात ‘जैवविविधता आणि फुलपाखरे’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवन ग्रुप आणि नेचरवॉक या संस्थेचे संजय देशपांडे आणि अनुज खरे यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वनजा निसर्गप्रेमी संस्थेच्या संस्थापक व प्रमुख प्रा. अस्मि ता जोशी, प्रा. अमृता बर्वे, ऋचिका जाधव आदींच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला.

डॉ. पटवर्धन म्हणाले, ‘‘ नव्वद टक्के पुष्पवनस्पती या परागीभवनासाठी प्राणी आणि कीटकांवर अवलंबून असतात. परागीभवनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या दोन लाख जीव प्रकारांपैकी ९५ टक्के कीटक असतात. त्यांच्या मदतीने फळे व फळभाज्या पिकविण्यासाठी त्यांच्याकडून होणारे परागीभवन उपयोगी ठरते. त्या अर्थाने जगातील अन्नसाखळीत कीटक व फुलपाखरे महत्त्वाची भूमिका बजावतात.’’

फुलपाखरे
डोंगरांचा विध्वंस थांबवा अन्यथा आणखी मोठ्या घटना घडतील - माधव गाडगीळ

मकरंद किंवा मध गोळा करणाऱ्या फुलझाडांच्या ५० प्रकारच्या रोपांमुळे सुमारे २५ प्रकारचे कीटक व फुलपाखरे त्यांची अंडी त्यावर घालतात आणि परागीवहनाचे निसर्गोपयोगी काम करतात. फुलपाखरांसाठी अंडी घालण्याच्या जागा कमी होत आहेत. यासाठी वास्तूरचनाशास्त्राच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या कल्पकतेतून फुलपाखरे आणि कीटकांसाठी उपयुक्त अधिवासाची रचना तयार करून उपयोगी वनस्पती लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सात वर्षांपूर्वी वनजा निसर्ग अभ्यास गट विद्यार्थ्यांसाठी स्थापन केल्यानंतर अनेक निसर्गप्रेमी संशोधकांना इथे त्यांचे विचार मांडण्यासाठी पाचारण करण्यात आले. यातून विद्यार्थीवर्गात निसर्ग संवर्धनाची माहिती, नवे ज्ञान व जागृती निर्माण होण्यास हातभार लागला आहे.

-प्रा. अस्मिता जोशी, संस्थापक वनजा निसर्गप्रेमी संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com