‘वर्क फ्रॉम होम’मुळे ट्रॅव्हल कंपन्यांचे बिघडले गणित

वर्क फ्रॉम होमचा एकूणच फटका ट्रॅव्हल्स कंपन्यांसोबत कॅबचालक, १७ सिट व २० सिट टेम्पो ट्रॅव्हलर अशा स्वरूपातील छोट्या-मोठ्या बस व्यावसायिकांनाही बसला आहे.
Travel
TravelSakal

कात्रज - कोरोनामुळे (Corona) केलेल्या लॉकडाउननंतर (Lockdown) दुसरी लाट आणि इंधनदरवाढ यासोबतच ट्रॅव्हल कंपन्यांना (Travel Company) आयटीसह अन्य कंपन्यांच्या ‘वर्क फ्रॉम होम’ (Work from Home) या कामाच्या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. आयटी कंपन्यांचे (IT Company) ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्याने या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना ने-आण करणाऱ्या बसगाड्या जाग्यावरच उभ्या आहेत. अनलॉकनंतर ऑटोमोबाईल कंपन्या सुरू झाल्या असल्या तरी गाड्यांच्या मागणीपेक्षा जास्त पुरवठा असल्याने बसमालकांची पिळवणूक होत असून स्पर्धा वाढली आहे. तसेच, डिझेल दरवाढीमुळे खर्चात वाढ झाली असून कंपन्यांकडून कुठल्याही प्रकारे वाढीव दर मिळत नसल्याचे बसमालक सांगत आहेत. (Work from Home Spoils the Travel Arithmetic of Travel Companies)

वर्क फ्रॉम होमचा एकूणच फटका ट्रॅव्हल्स कंपन्यांसोबत कॅबचालक, १७ सिट व २० सिट टेम्पो ट्रॅव्हलर अशा स्वरूपातील छोट्या-मोठ्या बस व्यावसायिकांनाही बसला आहे. यामध्ये एका गाडीचे मालक असणाऱ्या व्यवसायिकांचे नुकसान मोठे आहे. पुण्यातील हिंजवडी, वाकड, फुरसुंगी, तळवडे, खराडी, बाणेर, कोरेगाव पार्क, मगरपट्टा सिटी आदी भागात असणाऱ्या आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करणे ही या व्यवसायाची मोठी ताकद होती. मात्र, ‘वर्क फ्रॉम होम’मुळे हे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. भविष्यातही आयटी क्षेत्रातील काही कंपन्या ४० ते ६० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास मुभा देण्याच्या तयारीत असल्याने हा व्यवसाय अनलॉकनंतरही हवा तसा भरारी घेणार नाही, अशी भीती व्यावसायिकांमध्ये आहे. काही कॅबचालकांनी ओला, उबर कंपनीच्या मदतींने आपला व्यवसाय चालू ठेवला असला तरी त्यातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च हा ताळमेळ जुळविणे कठीण जात आहे.

Travel
काही तासांपूर्वी जन्मलेल्या बाळानं गिळली सोन्याची अंगठी

ट्रॅव्हल व्यवसायाबरोबरच यावर अवलंबून असणाऱ्या गॅरेजलाईन, स्पेअर पार्ट विक्रेते, जीपीएस ट्रॅकिंग कंपन्या, कुशन वर्क, टायर वर्किंग आदी व्यवसायांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

कोरोनापूर्वीची व्यवसायाची स्थिती

३ ते ४ लाख बसने प्रवास करणारे आयटी कर्मचारी

२ ते ३ हजार विविध कंपन्यांसाठी गाड्या

३ ते ४ हजार कॅबची संख्या

१६ ते १८ हजार थेट उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या व्यक्ती

आयटी क्षेत्राचे वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने गेल्या १८ महिन्यांपासून गाड्या जागेवर उभ्या आहेत. उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. उत्पन्न बंद असून खर्च चालू आहे. कर्जाच्या हप्त्यांसाठी फायनान्स कंपन्यांचा तगादा सुरु असून त्यांचे गुंड घरी येऊन त्रास देत आहेत.

- निखिल भोसले, बसमालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com