esakal | रांका ज्वेलर्सकडून पद्मावती देवीसाठी सुवर्णालंकार
sakal

बोलून बातमी शोधा

Padmavati_Devi

देवीची ही शिळा सुमारे 200 वर्षांपेक्षाही जास्त जुनी आहे. पद्मावती देवस्थान ट्रस्टतर्फे हे हार बनविण्यात आले. या हारांचे वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक भाग हा हस्तनिर्मित आहे.

रांका ज्वेलर्सकडून पद्मावती देवीसाठी सुवर्णालंकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पिसोळी परिसराची ग्रामकुलदेवी असणाऱ्या पद्मावती देवीसाठी अलंकार घडविण्याचे काम प्रसिद्ध सुवर्णपेढी रांका ज्वेलर्सने पूर्ण केले आहे. रांका ज्वेलर्सने पद्मावती देवीसाठी सोन्याच्या सुंदर हारांची निर्मिती केली आहे. यासाठी एकूण अंदाजे 1885 ग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आला. याची अंदाजे किंमत 97 लाख रुपये आहे. 

झेप्टोसेकंद : वेळेचा सर्वात लहान भाग मोजण्यात शास्त्रज्ञांना यश!​

शांताराम संभाजी मासाळ यांच्या माहितीनुसार, देवीची ही शिळा सुमारे 200 वर्षांपेक्षाही जास्त जुनी आहे. पद्मावती देवस्थान ट्रस्टतर्फे हे हार बनविण्यात आले. या हारांचे वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक भाग हा हस्तनिर्मित आहे. ही देवी शिलारूपात असल्यामुळे हाराचा आकार एकसारखा घडविता येणे आव्हानात्मक होते. त्यासाठी सुरुवातीला तांब्याचा वापर करून हाराच्या आकाराचा अंदाज घेण्यात आला. या हारातील मुख्य पेंडंट आणि इतर भाग घडविण्यासाठी मेणाचा वापर करण्यात आला आणि त्यानंतर ते जोडण्यात आले.

हा पट्टा घडविण्यासाठी 3240 कड्यांचा वापर केला गेला आणि या कड्यांच्या साह्याने 810 नक्षीकाम केलेले बेळगावी मणी, 277 सेमी प्रेशिअस रत्न लावण्यात आले. पद्मावती देवीच्या या प्राचीन मूर्तीसाठी अलंकार घडविण्याचे भाग्य लाभल्याबद्दल आनंदाची आणि समाधानाची भावना रांका ज्वेलर्सचे मानव रांका यांनी व्यक्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top