

Ongoing construction work at Vishrantwadi flyover site in Pune as commuters face daily traffic congestion ahead of Palkhi.
sakal
पुणे: विश्रांतवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील उड्डाणपूल व समतल विलगकाचे (ग्रेड सेपरेटर) काम पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. वाहतूक कोंडीमुळे कामावर येणाऱ्या मर्यादेबरोबरच अन्य विविध कारणांमुळे ही कामे संथ गतीने सुरू आहेत. विशेषतः संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा याच मार्गाने पुढे जातो, त्यामुळे किमान त्यापूर्वी तरी ही कामे मार्गी लागणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.