सिंहगड रस्त्याचे काम सुरू झाले मात्र दर्जा अत्यंत निकृष्ट; पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष

सिंहगड रस्त्याचे काम सुरू झाले मात्र दर्जा अत्यंत निकृष्ट; पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष
Updated on

किरकटवाडी : मागील दोन वर्षांपासून रखडलेले सिंहगड रस्त्याचे काम केंद्रीय जल अकादमीच्या गेट समोरून दि. 10 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरू झाले मात्र कॉंक्रिटीकरणासाठी 'हायब्रिड ऍन्युईटी' प्रमाणे ठरलेल्या करारानुसार आवश्यक असलेले 'स्लिम फॉर्म पेव्हर' हे रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन वापरण्याऐवजी ठेकेदार कामगारांकडून हाताने ओबडधोबड काम करून घेत आहे व अशा निकृष्ट पणे होत असलेल्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र दुर्लक्ष करत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिंहगड रस्त्याच्या नियोजित कामामध्ये नांदेड फाट्यावरील पूल ते डोणजे फाटा हा सुमारे 13 किलोमीटर अंतराचा टप्पा सिमेंट कॉंक्रिटचा आहे. ठरलेल्या कराराप्रमाणे ठेकेदाराने सदर कॉंक्रिटीकरणाच्या कामासाठी मशीनचा वापर करणे बंधनकारक आहे; परंतु ठेकेदार मशीनचा वापर न करता हातानेच काम करून घेत आहे. या अगोदरही ठेकेदाराने कोल्हेवाडी फाट्याजवळ आणि डी.आय.ए.टी जवळ मशीनचा वापर न करता हातानेच काम केल्याने तयार केलेल्या रस्त्याला मोठे तडे गेले आहेत. तसेच रस्ता अनेक ठिकाणी खालीवर झाला आहे. काँक्रीट भरताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेल्या प्लेट काढल्यानंतर योग्य प्रकारे काँग्रेट न भरले गेल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. अगोदरच कामाला होणारा विलंब आणि आता सुरू असलेले निकृष्ट काम यावर सार्वजनिक बांधकाम विभाग का कारवाई करत नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

काम सुरु झाले आणि पाऊस आला...अनेक दिवसांपासून रखडलेले काम दि.10 ऑक्टोबर रोजी सुरू झाले; परंतु त्याच वेळी मागील आठ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे 'नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने' या म्हणीचा प्रत्यय सिंहगड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना येत आहे.आता पावसाचे कारण सांगून ठेकेदार पुन्हा किती दिवस काम बंद ठेवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कॉंक्रिटीकरणासाठी मशीन आले होते पण...सिंहगड रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी काही महिन्यांपूर्वी ठेकेदाराने एक मशीन आणून नांदेड फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला ठेवले होते. मशीन आल्यानंतर वेगाने काम पूर्ण होईल असे रस्त्याच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना वाटत असताना काम न करताच काही दिवसांनी ठेकेदार ते मशीन पुन्हा घेऊन गेला.

आईसोबत बोलत थांबलेल्या तरुणावर हल्ला; तिघांनी लोखंडी सळईने केले वार​
 
इस्टिमेट प्रमाणे ठेकेदार काम करत नाही.ट्रिमिक्स, घोटई केली जात नाही.नीडल व्हायब्रेटर नसल्याने सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या तळापर्यंत व्यवस्थित बसत नाही. दाब देण्यासाठी मशीन नसल्यामुळे आतमध्ये तयार होणारे हवेचे बुडबुडे तसेच राहून त्यामुळे काहीच दिवसांमध्ये रस्त्याला तडे जाऊन पुन्हा रस्ता खराब होईल. ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे." -प्रशांत हगवणे, नागरिक, किरकटवाडी.

काँक्रीटीकरणासाठी मशीनचा वापर करायला हवा हे खरे आहे. ठेकेदाराला मशीन मागवण्याबाबत कळवले आहे. पुढील बारा वर्षे रस्त्याची देखभाल व दुरुस्ती ठेकेदाराकडे आहे; त्यामुळे निकृष्ट कामाचा तोटा ठेकेदारालाच सहन करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी रस्त्याचे निकृष्ट काम झाले आहे ते पुन्हा तोडून ठेकेदाराकडून व्यवस्थित करून घेतले जाणार आहे. बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com