
पुणे : पत्र्याचे शेड उभे करण्याचे काम करताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना नऱ्हे भागातील वरद एंटरप्रायझेस गुरुवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला. कामगारांना सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार असल्याच्या आरोपावरून ठेकेदाराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.