थेऊर - मी फाशी घेत आहे. माझा काम धंदा गेला, माझं आख्खं नुकसान झालं, माझा आख्खा पैसा पाणी गेला, या चार पाच जणांनी मलां वाटेला लावलं,' अशी व्हिडीओ क्लीप आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड करून एका कामगाराने जीवन संपविल्याची घटना घडली आहे..ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गारुडीवस्ती परिसरात घडली असून, बुधवारी उघडकीस आली आहे. लोणी काळभोर येथील इंडियन ऑईल टर्मिनल कंपनीच्या सुपरवायझरसह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम ज्ञानेश्वर भाले (वय-३८, रा. लोणी काळभोर) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे..सुनिल विजय कसबे (वय-३२), सारिका उर्फ सावित्रा सुनिल कसबे (वय-२७), सुनिता विजय कसबे (वय-४७), करण काळु कसबे (वय-२२, सर्व रा. गारुडीवस्ती, लोणी काळभोर), अक्षय केवट (वय-३०) व अजित सिंग (वय-३०, दोघेही रा. कदमवाकवस्ती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तुकाराम भाले यांच्या पत्नीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती तुकाराम भाले हे लोणी काळभोर येथील इंडियन ऑईल टर्मिनल कंपनीमध्ये काम करीत होते. तेव्हा आरोपी अक्षय केवट हा फिर्यादी यांना म्हणाला 'तु मला आवडते, मला तुझ्यासोबत रिलेशनमध्ये राहायचे आहे, तुझ्या नवऱ्याला देखील काही कळणार नाहीं' असे म्हणुन फिर्यादी यांची छेडछाड करून अश्लील बोलायचा. तसेच कोणीही नसताना फिर्यादी यांच्यासोबत लगट करून विनयभंग केला..फिर्यादी व त्यांचे पती तुकाराम भाले यांनी या प्रकाराबाबत कंपनीच्या वरिष्ठांकडे तक्रार केली. वरिष्ठांकडे तक्रार केल्याने सुपरवायझर अजित सिंग व सुनिल कसबे यांनी फिर्यादी यांना कामावरुन काढुन टाकले. त्यानंतर फिर्यादी यांचे पती तुकाराम भाले यांना सुध्दा कामावरुन काढुन टाकण्याची धमकी देवुन मानसिक त्रास दिला. या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून तुकाराम भाले यांनी राहत्या घरामध्ये लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली..दरम्यान, तुकाराम भाले यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी व स्वत:चा विनयभंग केल्याप्रकरणी पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.