
प्लॅस्टरचे काम सुरू असताना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला.
इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू, दोन ठेकेदारांवर गुन्हा दाखल
पुणे - प्लॅस्टरचे काम सुरू असताना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घोरपडी येथील बी.टी. कवडे रस्ता परिसरात घडली.
भूषणकुमार रामलाल साहू (वय ३०, रा. मोमीननगर, मांजरी) असे मृताचे नाव आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ठेकेदारांनी बी. टी. कवडे रस्त्यावरील अविराज बंगल्याचे काम घेतले आहे. भूषणकुमार हा दुसऱ्या मजल्याच्या छताच्या संरक्षण भिंतीच्या बाहेरील बाजूने बांबूच्या पहाडावर उभे राहून प्लॅस्टरचे काम करीत होता. त्यावेळी दुसऱ्या मजल्यावरून पडून त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
याबाबत भूषणकुमार साहू यांच्या पत्नी शारदा साहू (वय २८, रा. मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे. ठेकेदारांनी कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेची साधने उपलब्ध करून दिली नाहीत. तसेच, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट उपलब्ध करून न देता हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद टोपन्ना जाधव आणि नागेश शरणाप्पा चलवादी (दोघे. रा. मुंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पी. एस. माने करीत आहेत.
Web Title: Worker Killed After Falling From Building Charges Filed Against Two Contractors Crime Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..