Video : आपापल्या गावी परतणाऱ्या मजूरांना येताहेत अशा अडचणी...

Video : आपापल्या गावी परतणाऱ्या मजूरांना येताहेत अशा अडचणी...

टाकळी हाजी : कोरोनामुळे काम सुटल्याने गावच्या ओढीने अनेक मजूर पायी चालत आहेत. आमच्या राज्यातून उपाशी जाऊ नका, अस म्हणत कित्येक संस्थांनी, तरूणांनी पुढाकार घेऊन त्यांना एकवेळचे का होईना जेवण दिले. पण पायी खडतर प्रवास करून स्वगृही परतल्यावर त्यांना पाणी मिळेना अन्नावाचून मुले मरण यातना सोसू लागली आहेत. गावाकडचे बांधव घराकडे येऊ देईना. महाराष्ट्रात काम केल पण त्यांनी आमची सेवाच केली, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशकडे पोहचलेल्या मजूरांकडून व्हॉट्सऍपवर येऊ लागल्या आहेत.

भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी महाराष्ट्रात परप्रांतीय कामगार अनेक वर्षापासून येतात. मजूरीच्या नात्यातून त्यांची नाळ येथील नागरिकांमध्ये मिळून पूर्ण भाकरीच मिळू लागते. त्यासाठी शहरच काय पण ग्रामीण भागात देखील बांधकाम व इतर व्यवसायाच्या माध्यमातून समाजात पाहावयास मिळाली आहे. काम नाही मग खायच काय या धर्तीवर परप्रातीयांना गावची ओढ लागणे सहाजीकच आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कंपन्या बंद पडल्या आणि चाकण 
व शिरूर औद्योगिक वसाहतींमधून मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग पायी गावाकडे निघाला होता. खेड व शिरूर तालुक्यातील नागरिकांनी व तरूणांनी त्यांना अन्न-पाण्याबरोबर एक दिवसाची राहण्याची सुविधा निर्माण करून दिली होती. 

राज्यभरातून पायी चालणाऱ्या या कामगारांचे होणारे हाल पाहून महाराष्ट्रीय जनता देखील हळहळली होती. वाहतुकीचा प्रश्न सुटेपर्यंत राज्यातील पुणे-नगर महामार्गांवर अनेक सेवा संस्थांनी अन्नछत्र देखील उघडली. सायकलीवर प्रवास करणारे कामगार देखील मोठ्या प्रमाणात दिसून आले. लॅाकडाऊनच्या काळात भरउन्हात या कामगारांना राज्यातील जनतेने सहकार्य केले. अखेर रेल्वे तसेच चारचाकी व इतर वाहनांच्या सहाय्याने हे कामगार गावाजवळ पोहचले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावाजवळ पोहचल्यावर मात्र पाणी मिळेना की अन्नावाचून मुले मरतील, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. गावेची गावे खाली झाली असून, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने गावाकडे त्यांना घराकडे येऊ देईनात. पण घरी परतलेल्या परप्रांतीयांच्या राज्याच्या सीमेवर वाहनांच्या रांगा व स्वगृही परतलेल्या मजूरांची गर्दी दिसू लागली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्तर प्रदेशच्या सीमेवर 50 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गाव कोरोनाच्या भीतीने बंद आहे. पाणी मिळेना की कोणी अन्न देईनात लहान-लहान मुले भुकेसाठी तडफडू लागली आहेत. महाराष्ट्रातील जनतेने आमच्यासाठी अन्न छत्रे उघडून सहकार्य केले. त्यांचे आभार...

- उत्तर प्रदेशमधून परप्रांतीय कामगार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com