esakal | कामगारांनो, मूळगावी परत जायचंय? मग ही महत्वाची बातमी आधी वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Workers must provide information on this link to return home

1. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास किंवा त्या जिल्ह्यातून या क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.
2. मात्र, या दोन्ही क्षेत्रातून  महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) जाण्याची परवानगी आहे.

कामगारांनो, मूळगावी परत जायचंय? मग ही महत्वाची बातमी आधी वाचा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु यांच्यासह इतर कंटेनमेंट झोनच्या बाहेर असणाऱ्या नागरिकांनाच त्यांच्या मूळ गावी जाता येणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या नागरिकांना परवानगी हवी असल्यास लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी. माहिती भरताना सोबत खालील कागदपत्रे अपलोड करावीत. नजीकच्या काळातील स्पष्ट फोटो, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडून फ्लू सदृश्य आजार नसल्याचे प्रमाणपत्र आपल्या पत्त्यासह किंवा आधारकार्ड
या लिंकवर माहिती पाठवावी :   https://covid19.mhpolice.in/

अधिक माहितीसाठी संपर्क : 
020 - 26111061
020 - 26123371

E-mail Id:- dcegspune1@gmail.com

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अन्य जिल्ह्यात ये-जा करण्यास परवानगी नाही

1. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास किंवा त्या जिल्ह्यातून या क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.
2. मात्र, या दोन्ही क्षेत्रातून  महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) जाण्याची परवानगी आहे.
3. पोलिस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर, नागपूर आदी) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची  परवानगी देण्याचे अधिकार  संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत. 
4. परवानगीसाठी जवळच्या पोलिस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड-१९ प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून  पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. 
5. अर्धवट किंवा अनधिकृत किंवा ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नये, कोणीही  धावाधाव करू नये.

पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक

loading image