बारामतीत अडकलेले मजूर परतणार त्यांच्या गावी; पाच बसेस मध्यप्रदेशकडे रवाना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

- बारामतीतून प्रत्येकी 22 कर्मचारी असलेल्या पाच बसेस मध्यप्रदेशच्या सीमेकडे रवाना झाल्या.

बारामती : परप्रांतीय मजुरांना स्वगृही परतण्यास अखेर मुहूर्त मिळाला. बारामतीतून प्रत्येकी 22 कर्मचारी असलेल्या पाच बसेस मध्यप्रदेशच्या सीमेकडे रवाना झाल्या. येथील प्रशासकीय कार्यालयातून या पाच बसेस पाठवल्या गेल्या. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, आगारप्रमुख अमोल गोंजारी यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील परप्रांतीय मजूरांना आपल्या स्वगृही परतायचे होते. मात्र, रेल्वे व रस्ता मार्ग बंद असल्याने त्यांची कोंडी झाली होती. राज्य शासनाने मोफत प्रवासाची सुविधा दिल्यामुळे आज 110 मजूर मध्यप्रदेशच्या सीमेकडे रवाना झाले. राज्य परिवहन मंडळाच्या वतीने त्यांना सीमेपर्यंत सोडले जाणार असून, सीमेवरुन मध्यप्रदेश सरकार त्यांना स्वगृही पाठवण्याची व्यवस्था करणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, परप्रांतीय मजूरांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरु असून, 22 च्या गटाने त्यांना त्यांच्या राज्यातील सीमेपर्यंत पोहोचविले जाणार असल्याचे अमोल गोंजारी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers Returning their Home via Buses