

तळेगाव स्टेशन, ता. २ : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया आणि इंद्रायणी विद्यामंदिर संस्था यांच्यातर्फे येत्या बुधवारी जागतिक फार्मासिस्ट दिन आणि राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेच्या येथील कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम होईल. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्हे आणि मुंबई विभागातील २५० फार्मसी महाविद्यालयांतील प्राचार्य, ५०० प्राध्यापक आणि सुमारे १८०० विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. औषधांचा सुरक्षित आणि योग्य वापर, फार्मसिस्टचे रुग्णसेवेतील योगदान तसेच प्रतिजैविक प्रतिकारशक्तीच्या वाढत्या समस्येबाबत समाजात जनजागृती करण्याचा यामागील उद्देश आहे. सप्ताहादरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम होतील. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोंटुकुमार पटेल प्रमुख पाहुणे असतील.
निमंत्रक फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य विजय पाटील असून, नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, इंडियाचे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल, डॉ. श्रीकांत जोशी आदींच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. प्रवीण जावळे, डॉ. विक्रम शिंदे आणि प्राचार्य डॉ. संजय आरोटे नियोजन करीत आहेत.
यावेळी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार निरूपा कानिटकर, फार्मसी कौन्सिलचे राज्य समन्वयक प्रा. प्रवीण जावळे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आदी उपस्थित होते.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.