Pune : दक्षिण पुण्यात जागतिक स्मरण दिन साजरा ; रस्ते महामार्गावर जीव गमावलेल्यांना आदरांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : दक्षिण पुण्यात जागतिक स्मरण दिन साजरा ; रस्ते महामार्गावर जीव गमावलेल्यांना आदरांजली

आंबेगाव : प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, भरत मोटार ड्रायव्हिंग स्कूल, श्री.सिद्धिविनायक संस्कृती शैक्षणिक प्रतिष्ठान दत्तनगर तसेच युवा संवाद सामाजिक संस्था यांच्या संयुक्तविद्यमाने कै.विठ्ठलराव बेलदरे पाटील चौक दत्तनगर आंबेगाव येथे रस्ते महामार्ग अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींचा स्मरणदिन आदरांजली मेणबत्ती लावून करण्यात आला. यावेळी,दत्तनगर चौक येथे हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना गुलाब पुष्प देऊन हेल्मेट वापरण्याबद्दल आभार व्यक्त केले.यावेळी रांगोळी आणि वाहतूक फलकांच्या माध्यमातून रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र पाटील म्हणाले की, जगात साधारण दिवसाला चौतीसशे नागरिक मृत्यू पडत असतात.या आकडेवारीतील आठ टक्के लोक हे आपल्या भारत देशात मृत्यूमुखी पडतात याचाच अर्थ देशात दिवसाला ४११ लोक मृत्यू पडत आहेत. ही चिंताजनक बाब आहे.याची गंभीर दाखल घेत युनेस्को वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशन कडून २०२१ते २०३० या दशकात रस्ता सुरक्षा कार्यक्रम राबविण्यात येते आहे. रस्ता वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

यावेळी माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील, मोटार वाहन निरीक्षक अभिजित कांबळे, सतीश माळी, अमृता दिवटे, भरत मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे भरत गायकवाड, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड, भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस कर्मचारी महेश पवार, बाळासाहेब नगराळे, संदीप पवार,दीपक फंड, कुणाल बेलदरे पाटील, विनोद खुडे,रुस्तम पुंड, राजू वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.