लेखक-प्रकाशक संमेलन यंदा होणार चिपळूणला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, चिपळूण शाखा तसेच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन २८ आणि २९ डिसेंबर रोजी चिपळूण येथे होणार आहे. मेहता पब्लिशिंग हाउसचे प्रमुख अनिल मेहता यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी सोमवारी (ता. ४) पत्रकार परिषदेत दिली.

पुणे - अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, चिपळूण शाखा तसेच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन २८ आणि २९ डिसेंबर रोजी चिपळूण येथे होणार आहे. मेहता पब्लिशिंग हाउसचे प्रमुख अनिल मेहता यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी सोमवारी (ता. ४) पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या वर्षी पहिले लेखक-प्रकाशक संमेलन ‘पुस्तकांचे गाव’ भिलार येथे पार पडले. यंदा या संमेलनाचे दुसरे वर्ष असून, संमेलनाचे स्वागताध्यक्षपद कोकणातील लेखक आणि कृषिभूषण डॉ. तानाजी चोरगे भूषविणार आहेत. कार्याध्यक्ष म्हणून लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष कवी अरुण इंगवले राहणार आहेत. लेखक, प्रकाशक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन बर्वे आणि इंगवले यांनी केले आहे.संमेलनात ‘प्रकाशकांच्या समस्या’, ‘ग्रंथविक्रीच्या नव्या वाटा-नव्या दिशा’, ‘प्रवास पुस्तकनिर्मितीचा’, ‘व्यवसायापलीकडचे लेखक-प्रकाशक स्नेहबंध’ अशा विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. तर, ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांची प्रकट मुलाखत होणार आहे. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: writer publisher sammelan in chiplun