यश कडाळेला नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये चार गोल्ड व एक सिल्वर मेडल

नुकत्याच नेपाळ येथे झालेल्या इन्हीटेशनल इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत सहा सामन्यांमध्ये तब्बल १६ बळी व ४९ धावा
Kadale won four gold and one silver medal in the National Championship
Kadale won four gold and one silver medal in the National Championship

पारगाव - आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात डोंगराच्या कुशीत वसलेल्या पहाडदरा गावातील आदिवासी ठाकर समाजातील यश पांडूरग कडाळे या तरुणाने क्रीकेटमध्ये १६ वर्षाखालील गटात देशात गोवा, बिहार, पंजाब या राज्यात झालेल्या चार नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत चारही ठिकाणी गोल्ड मेडल तसेच नुकत्याच नेपाळ येथे झालेल्या इन्हीटेशनल इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धेत एकूण सहा सामन्यांमध्ये तब्बल १६ बळी व ४९ धावा करून त्याने आपले अष्टपैलुत्व सिध्द केले आहे त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल सिल्व्हर मेडल देऊन सन्मानीत करण्यात आले. त्याच्या उत्तुंग यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पहाडदऱ्यातील वरच्या ठाकरवाडीतील पांडुरंग सोमा कडाळे हे अत्यंत बिकट परिस्थतीत उच्च शिक्षण घेऊन गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर (नारायणगाव) शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या मुलगा यश हा इयत्ता दहावीची परीक्षा झाल्यानंतर वडिलांकडे त्याने मला क्रिकेट खेळायचे आहे मला बॅट घेऊन द्या असा हट्ट धरला वडिलांनी त्याला बॅट आणून दिल्यानंतर तो मित्रांमध्ये अगदी तहान भूक विसरून दिवसभर क्रिकेट खेळू लागला त्याची क्रिकेट खेळाबद्दलची आवड पाहून वडिलांनी त्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली.

यश क्रिकेटच्या पुढील प्रशिक्षणासाठी दि. १७ एप्रिल २०१९ पासून पुणे येथे नेहरू स्टेडियम क्रिकेट क्लब मध्ये प्रशिक्षक मारवाडी यांच्या मागदर्शनाखाली १६ वर्षाखालील गटात क्रिकेटचे धडे घ्यायला सुरुवात केली यासाठी त्याने तीन महिने दररोज नारायणगाव ते पुणे एसटीने जाऊन येऊन प्रशिक्षण पूर्ण केले मेहनत आणि वडीलांची साथ याच्या जोरावर त्याने अथक परिश्रम घेत क्रीकेट खेळातील सर्व बारकावे आत्मसात करून दि. १५ ऑगस्ट ते दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीसाठी त्याची निवड युनायटेड किंगडम ( युके ) आयरलँड येथील ( डंगरूम क्रिकेट कलब ) येथे झाली परंतु दुर्दैवाने त्यावेळी नुकतीच जगातील अनेक देशात कोरोनाचे रुग्ण सापडु लागले होते.

कोरोनाच्या सावटामुळे त्याला त्या दौऱ्यासाठी जाता आले नाही दरम्यानच्या काळात कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर त्याने पुन्हा मेहनत करायला सुरुवात केली त्याने तिसऱ्या नॅशनल फेडरेशन कप २०२०-२१ नॅशनल चॅम्पियनशिप २०२०-२१ गोवा येथे ( दि.२९ ते दि.३१ जानेवारी २०२१) या कालावधीत सहभागी होऊन मॅच फिनिशर (नाबाद ४६ धावा) अशी उत्कृष्ठ कामगीरी करून गोल्ड मेडल पटकाविले नंतर त्याने चौथ्या नॅशनल फेडरेशन कप २०२० -२१ नॅशनल चॅम्पियनशिप २०२०-२१ बिहार पटना येथे (दि. १८ ते दि.२० मार्च २०२१ ) या कालावधीत सहभागी होऊन त्याने नाबाद अर्धशतक झळकवत मेडल व ट्रॉफी जिंकली चौथ्या नॅशनल चॅम्पियनशिप २०२१-२२ पंजाब येथे (दि. ०६ ते दि.०८ ऑगष्ट २०२१ ) या कालावधीत सहभागी होऊन उत्कृष्ठ गोलंदाजी करत गोल्ड मेडल जिंकले, ऑल इंडिया यशदा नॅशनल चॅम्पियनशिप २०२२ पंजाब येथे ( दि. ०४ ते दि.०८ जुन २०२२ ) या कालावधीत सहभागी होऊन पुन्हा एकदा उत्कृष्ठ गोलंदाजी करत गोल्ड मेडल पटकाविले.

नुकत्याच दि. १७ ते दि. २१ जुलै या कालावधीत नेपाळ येथे झालेल्या इन्हीटेशनल इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२२ मध्ये सहभागी होऊन सहा मॅच मध्ये उत्कृष्ठ गोलंदाजी करत तब्बल १६ बळी व ४९ धावा करून पुन्हा आपले अष्टपैलुत्व सिध्द केले या उत्तुंग कामगिरी बद्दल त्याचा सिल्व्हर मेडल देऊन सन्मान करण्यात आला यशची आता मुंबई येथे टाईम सील कॅम्प साठी निवड झाली आहे त्याच्या या नेत्रीद्प्क यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवान वाघ, बाळासाहेब वाघ, सरपंच राजश्री संतोष कुरकुटे, उद्योजक विकास कुरकुटे, सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मच्छिंद्र वाघ व विठ्ठल वीर याने यश चे अभिनदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com