

‘यशोदा’च्या विद्यार्थिनींचे
बीफार्म परीक्षेमध्ये यश
सातारा, ता. २८ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या बीफार्म अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर परीक्षांचे निकाल जाहीर झाले. येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फार्मसी विभागातील विद्यार्थिनींनी यश मिळविले. परीक्षेत तनिष्का शिंगाटेने प्रथम, प्राजक्ता पिलावरेने द्वितीय, गौरी खाडे, साक्षी पिसाळ यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेले हे कॅम्पस फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो. अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाभिमुख दृष्टिकोन आणि अनुभवी प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल प्रतिवर्षी उल्लेखनीय लागत आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे, प्राचार्य डॉ. पी. डी. जाधव, फार्मसी विभागप्रमुख डॉ. ए. एम. भागवत यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
W15402
तनिष्का शिंगाटे
W15403
साक्षी पिसाळ
W15404
प्राजक्ता पिलावरे
W15405
गौरी खाडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.