

‘सुंदर माझी शाळा’त ‘यशवंत’ प्रथम
कऱ्हाड, ता. २२ ः येथील यशवंत हायस्कूलने ‘सुंदर माझी शाळा अभियान २०२५-२६’ मध्ये यश मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला. सासवड येथील संत सोपानकाका सहकारी बँक व संत सोपानकाका फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतून तब्बल ४०६२ शाळांच्या सर्वेक्षणातून यशवंत हायस्कूलची जिल्ह्यातून प्रथम क्रमांकासाठी निवड झाली.
सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमात शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते शाळेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार संजय जगताप, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. रवींद्र पवार, मुख्याध्यापक व्ही. यू. पाटील, पर्यवेक्षिका एस. एस. मोरे, माजी मुख्याध्यापक एस. एम. महामुलकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
मुख्याध्यापक पाटील, श्री. महामुलकर, एस. डी. शेडगे, एस. एम. घारगे, झहीर शेख, व्ही. टी. येसनकर, अमोल यादव हे उपस्थित होते.
W27129
सासवड ः प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना व्ही. यू. पाटील. त्या वेळी एस. एम. महामुलकर, एस. एम. घारगे.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.