थेऊर यशवंत साखर कारखान्यात भ्रष्टाचाराची जंत्री

धनंजय चौधरी यांची पोलिसांकडे चौकशीची मागणी
Yashwant sahakari sakhar karkhana theur corruption news
Yashwant sahakari sakhar karkhana theur corruption newssakal

लोणी काळभोर : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यात कामगारांचे पगार आणि शेतकऱ्यांची बिले थकवली असून हा भ्रष्टाचार दडपण्यासाठी कारखानाही पेटवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी कारखान्याच्या संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल अशी मागणी शेतकरी संघटनेचे धनंजय चौधरी यांनी केली आहे. याबाबत तपास लवकरात लवकर तो निष्पक्षपातीपणे व्हावा अशी मागणीही त्यांनी लोणी काळभोर पोलिसांना केली आहे.

याबाबत त्यांनी कारखान्याचे संचालक अशोक काशीनाथ काळभोर, गोपाळ रामचंद्र म्हस्के, रोहिदास दामोदर उंद्रे, अंकुश परसरा घुले, अरविंद खंडेराव चौधरी, लतिका विलास काळभोर, शैला दिलीप काळभोर, महादेव तुकाराम कांचन, दत्तात्रय विठ्ठल चौधरी, बापूसाहेब बोधे, राजेंद्र टिळेकर, महादेव काळभोर, बाजीराव कामठे, राजू घुले, राहुल काळभोर, सुभाष जगताप, रामदास चौधरी, पंढरीनाथ पठारे, मारूती कुंजीर, रामदास गायकवाड, सीताराम खेसे, जाणकू कदम, खंडेराव कांचन, चंद्रकांत घुले, अशोक पाटील, शामराव कोतवाल, रघुनाथ चौधरी यांच्याविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Yashwant sahakari sakhar karkhana theur corruption news
मनपा कर्मचाऱ्यांना शिविगाळ करणारे विरोधी पक्ष नेत्यांविरुद्ध आंदोलन

हा कारखाना २०१९ पासून बंद आहे. कारखान्यात ३० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कारखान्याने शेतकऱ्यांची बिले आणि कामगारांचे पगार थकवले. भ्रष्टाचाराचा पुरावा नष्ट करण्यासाठी २०१९ पासून नियोजनबद्ध पद्धतीने साहित्य चोरीला जाणे, कारखाना पेटवणे अशा बाबी केल्या. याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी, गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर फौजदारी खटला करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Yashwant sahakari sakhar karkhana theur corruption news
आधी नोकरी मग अत्याचार; महिला दरवाजा तोडून पोहचली पोलिस ठाण्यात

मोठ्या माशांचा हात

कारखान्याची भिंत पाडून त्या जागी बेकायदेशीररीत्या वाहनतळ उभारले असून बाजारही भरवला जात आहे, तसेच त्यामुळे कारखान्यातील किमती साहित्य सहज चोरी करता येत आहे, असेही त्यांनी तक्रीत नमूद केले आहे. २००३ मध्येही कारखान्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी बेमुदत उपोषण करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली. हे प्रकरण गंभीर असून यात मोठ्या माशांचा हात आहे. त्यामुळे घटनेची चौकशी निष्पक्ष होऊन संबंधित शेतकरी व कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Yashwant sahakari sakhar karkhana theur corruption news
photos : मध्यरात्री सिनेस्टाईलने केला राडा...कोयत्याने दरवाजा तोडून घरात शिरले...अन् मग

''या भ्रष्टाचारात मोठे नेते, संचालकांचा सहभाग असून बिले थकवणे, पगार न देणे हा दडपशाहीचाच एक भाग आहे. याप्रकरणी खासदार राजू शेट्टी, युक्रांदचे कुमार सप्तर्षी तसेच इतर कामगार नेत्यांनी कामगारांचा मेळावा आयोजित केला होता. त्यानंतर रास्ता रोकोही करण्यात आला. तेव्हा कारखान्याच्या काही सदस्यांनी मारहाण करून जीवितास धोका निर्माण केला.''

- धनंजय चौधरी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com