photos : मध्यरात्री सिनेस्टाईलने केला राडा...कोयत्याने दरवाजा तोडून घरात शिरले...अन् मग

crime.jpg
crime.jpg

नाशिक : नाशिकरोड परिसरात संघटित गुन्हेगारी वाढत असून शुक्रवारी (ता.12) रात्री रोकडोबावाडी, देवळालीगाव, सुंदरनगरमध्ये घरावर हल्ला अन् वाहनांची तोडफोड करत गुंडांनी राडा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अशी आहे घटना

देवळाली गावातील सुंदरनगर भागात राहणाऱ्या प्रमिला बापू कुमावत यांनी दिलेल्या फिर्यादीत शुक्रवारी (ता.12) मध्यरात्रीच्या सुमारास जय उर्फ मारुती वाल्मीक घोरपडे, साहील आवारे, साहिल उर्फ पोशा, सत्तू रावत, राहूल उज्जैनवाल, अनिकेत गिते, इंद्या वाघ, समीर राठोड, अमन वर्मा, वाल्मीक घोरपडे, मंगल घोरपडे, वैभव, चिन्या व त्यांचे इतर तीन ते चार साथीदारांनी दरवाजा कोयत्यांनी तोडून घरात प्रवेश केला. प्रमिला यांचा मुलगा जनार्दन कुमावत याच्यावर कोयत्याने हल्ला केला, डोक्‍यात कोयता मारला परंतू जनार्दनने तो हुकवल्याने हातावर गंभीर जखम झाली. इतरांनी महिला व इतर मुलांना कोयत्याचा धाक दाखवत दूर ठेवले. जनार्दनला मारहाणीत खांद्यालाही कोयत्याने जखम झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नागरिकांत मोठी घबराहट

हल्ल्यानंतर या टोळक्‍याने परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने सुंदरनगर भागात उभ्या असलेल्या चार चाकी, मोटार सायकल व रिक्षांची तोडफोड केली, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणे प्रकरणी उपनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला.सहा ते सात जणांच्या टोळीने परिसरात दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड केली. घरांच्या दरवाजे, खिडक्‍यांवर कोयते, तलवारींनी हल्ले करुन मोठ्याने शिवीगाळ करीत लोकांना धमकावले. त्यामुळे मोठी घबराहट पसरली होती. पोलीसांनी या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. यासंदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हेगारांचा हा पॅटर्नच

या घटनेनंतर पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी येथील नागरीकांशी चर्चा केली. घटनेची माहिती घेतली. त्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला. यावेळी नागरीकांतील चर्चा, पोलिसांची माहितीनुसार शहरातील गुन्हेगारांचा हा पॅटर्न तयार होत आहे. शाळकरी मुले, दहावी- अकरावीची परिक्षा दिलेली मुले यामध्ये आकर्षण म्हणून या प्रकारांकडे वळत आहेत. त्यांचा आदर्श ठरत आहेत, वाहिन्यांवर भडीमार असलेले दाक्षिणात्य चित्रपट. या चित्रपटांत गुन्हेगार मोठ्या टोळीने कोयते घेऊन दहशत निर्माण करतात. तो पॅटर्न या युवकांमध्ये पॉप्युलर होत आहे. त्याबाबत विश्‍वास नांगरे पाटील आता हे आव्हान कसे मोडून काढतात, याची उत्सुकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com