Yashwantrao Chavan Festival : यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात आमोंडी शाळेची बहारदार कामगिरी!

Sports Culture, : आमोंडी येथे आयोजित यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात विविध शाळांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. आमोंडी जिल्हा परिषद शाळेने विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत केंद्रात सर्वोत्कृष्ट ठरली.
Yashwantrao Chavan Art, Sports & Cultural Festival Held at Amondi

Yashwantrao Chavan Art, Sports & Cultural Festival Held at Amondi

Sakal

Updated on

घोडेगाव : यशवंतराव चव्हाण कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव केंद्रस्तरीय स्पर्धा लालबहादूर शास्त्री विद्यालय आमोंडी( ता आंबेगाव)येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते गुलाबराव वळसे , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान आमोंडी गावचे उपसरपंच धनंजय फलके होते. यात आमोंडी जिल्हा परिषद शाळेने सर्व प्रकारात घवघवीत यश संपादन केले. याप्रसंगी पंचायत समिती आंबेगावच्या आमोंडी बीडच्या विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर , केंद्रप्रमुख सुनील कुऱ्हाडे , सह्याद्री आदिवासी विकास प्रतिष्ठानचे सचिव विलास पंदारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश बिबवे, जनार्दन फलके, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.बी. , मुख्याध्यापिका वैशाली भोंडवे आमोंडी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक, ग्रामस्थ पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com