
YCMO University कृषि शिक्षण केंद्रातील नयना शेवाळे,रामनाथ खतोडे राज्यात प्रथम
नारायणगाव : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत येथिल ग्रामोन्नती मंडळ संचलित मुक्त कृषि शिक्षण केंद्रातील नयना हनुमंत शेवाळे हिने भाजीपाला उत्पादन पदविका शिक्षण अभ्यासक्रमात, रामनाथ रंगनाथ खतोडे यांनी फुल शेती उत्पादन पदविका शिक्षण अभ्यासक्रमात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला तर अपेक्षा संतोष गिरे हिचा कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका शिक्षण अभ्यासक्रमात द्वितीय क्रमांक आला. आशी माहीती मुक्त कृषि शिक्षण केंद्राचे केंद्र संयोजक प्रा.डी.आर.भुजबळ यांनी दिली.
नाशिक येथे झालेल्या २७ व्या दीक्षांत समारंभात राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रा.के. वाय. सोनवणे स्मृती पारितोषिक, यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवुन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इ. वायुनंदन होते. कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अनिल कुलकर्णी, कृषी विज्ञान विद्या शाखेचे संचालक डॉ. माधुरी सोनवणे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील साठ केंद्रातील प्रत्येक शिक्षण क्रमाच्या ३ हजार ६०० विद्यार्थ्यांमधून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांना कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे तज्ञ मार्गदर्शक चिराग बाळासाहेब भुजबळ, डॉ. सत्यवान थोरात यांनी मार्गदर्शन केले. प्रतिवर्षी शिक्षणक्रमात प्रथम येण्याची परंपरा यावर्षीही नारायणगाव शिक्षण केंद्राने कायम ठेवली असल्याची माहिती माहिती केंद्र संयोजक भुजबळ यांनी दिली. ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर , शेती समिती प्रमुख रत्नदीप भरवीरकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Web Title: Yashwantrao Chavan Maharashtra Open University Agricultural Education Nayana Shewale Ramnath Khatode First In State
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..