Yavat violence after Facebook post in Pune : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. फेसबूक पोस्टवरून मोठा वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी दोन गट आमनेसामने आले असून दुचाकीची जाळण्यात आली. तसेच वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरावर दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. या प्रार्श्वभूमीवर सर्व दुकानं बंद करण्यात आली आहेत.