पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टवरुन हिंसाचार उसळला आणि दोन गट भिडले. यवतमधील बाजारपेठ बंद झाली आणि त्यानंतर परिसरातील विविध ठिकाणातील घरांना लक्ष्य करत त्यांना आगी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली आणि जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. तणावग्रस्त परिस्थितीमुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पण आता परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यांनी यवतमध्ये परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.