यवतच्या पोलिसांनी परराज्यात केली अशी दबंग कामगिरी

police
police
Updated on

वरवंड (पुणे) : दौंड तालुक्यातील वरवंड येथे उभ्या असलेल्या ट्रकमधील सहा लाख 28 हजार रुपयांचा लोखंडी पत्रा (प्लेट) चोरून परराज्यात घेऊन गेलेल्या दोन आरोपींचा यवत पोलिसांनी परराज्यात कर्नाटक व तेलंगणामध्ये जाऊन मोठ्या शिताफीने तपास केला. तसेच, एका आरोपीसह मुद्देमाल ताब्यात घेतला. जहीर सुलतान बागवान (रा. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे; तर दस्तगीर महबूबसाब (रा. बिदर) हा दुसरा आरोपी फरारी आहे. 

याबाबत यवत पोलिस ठाण्यात मागील महिन्यात मंजूपटेल बिरादार (रा. मुंबई-वाशी) यांनी फिर्याद दिली होती की, "बालाजी ट्रान्स्पोर्ट' यांचा 24 टन 600 किलो वजनाचा लोखंडी पत्रा हैदराबाद (तेलंगणा) येथे पोचविण्यासाठी मुंबई येथे 12 नोव्हेंबर रोजी ट्रकमध्ये (क्र. केए 56-3655) भरला. सोलापूर महामार्गाने तो घेऊन जाताना दौंड तालुक्‍यातील वरवंड येथे ट्रकच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ट्रकचालक यमणप्पा पिरप्पा कडीमणी (रा. बसवकल्याण) यांनी फिर्यादी बिराजदार यांना संपर्क साधून, "कर्नाटकवरून मॅकेनिक घेऊन येतो,' असे सांगून तो गेला. त्यानंतर मॅकेनिकमार्फत इंजिन खोलून दुरुस्तीसाठी कर्नाटकात नेण्यात आले.

यादरम्यान ऑर्डरच्या ठिकाणी वेळेत न पोचल्याने माल घेणारा व्यक्ती वारंवार फोन करून "माल कधी येणार?' अशी विचारणा करत होता. त्यामुळे फिर्यादी बिरादार यांनी पत्रा घेऊन जाण्यासाठी दुसरा ट्रक बोलविला. मात्र, या वेळी नादुरुस्त उभ्या असलेल्या ट्रकमध्ये पत्रा कमी आढळला. ट्रकमधील एकूण मालापैकी 13 टन 600 किलो (सहा लाख 88 हजार रुपये किंमत) पत्रा चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. 

याबाबत बिराजदार 12 डिसेंबर 2019 रोजी यवत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी तपासासाठी पोलिस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे, पोलिस नाईक गणेश पोटे, विजय भापकर या पोलिसांचे एक पथक केले. या पथकाने हैदराबाद, कर्नाटक येथे जाऊन मोठ्या शिताफीने तपास करत गुन्ह्याची उकल केली. तसेच, एका ओरापीसह मुद्देमाल ताब्यात घेतला. आरोपीला दौंड न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. 

या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Treasury Officer Suffers Heart Attack In Manchar Doctors Timely Treatment Helps Save His Life After Severe Chest Pain
Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Marathi News Esakal
www.esakal.com