
पुणे - अतिपाऊस हा जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या पेरण्यांवर बेतला आहे. दरवर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत संपणारा पाऊस यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पडत राहिल्याने, शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरण्या करण्यात मोठा अडसर आला. परिणामी, पेरण्यांना खूप उशिरा झाला.
काहींनी पेरण्याच केल्या नाहीत. यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनात सुमारे २० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
आजअखेर जिल्ह्यात केवळ तीन लाख ११ हजार ४३३ हेक्टर क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांचे हे प्रमाण ६० टक्के एवढे आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात लांबलेल्या पावसाची मोठी किंमत रब्बी पिकांना मोजावी लागली आहे. या वृत्ताला कृषी विभागातील अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
दरम्यान, आता रब्बी पेरण्यांचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे या क्षेत्रात यापुढे वाढ होणे दुरापास्त आहे, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून सांगण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील ५४२ गावे ही रब्बी पिकाची गावे आहेत. या हंगामात प्रामुख्याने रब्बी ज्वारी, गहू, मका, तृणधान्य, हरभरा, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल, गळितधान्य, कांदा, भाजीपाला आदी पिके घेतली जातात. याशिवाय उसाची लागवडही केली जाते.
सद्यःस्थितीत जिल्ह्यातील ऊस लागवडीचे एकूण सरासरी क्षेत्र हे तीन लाख ९८ हजार ८९६ हेक्टर इतके आहे. त्यापैकी आजअखेर १ लाख ३० हजार, ६३१ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील रब्बीचे एकूण सरासरी क्षेत्र पाच लाख २२ हजार ५२७ हेक्टर एवढे आहे. त्यापैकी तीन लाख ११ हजार ४३३ हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.