यंदा बटाट्याच्या आगारातच बटाटा लागवडीत झाली घट

This year there was a decline in potato cultivation
This year there was a decline in potato cultivation
Updated on

सातगाव पठार : आंबेगाव तालुक्यातील बटाटा पिकाचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या सातगाव पठार भागात यंदाच्या खरीप हंगामात बटाटा पिकाची लागवड दरवर्षी पेक्षा 20 टक्के कमी प्रमाणावर झाली आहे. भांडवली खर्चात होणारी वाढ तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बटाटा काढणीसाठी मजूर मिळणार का नाही याची चिंता आदी कारणांमुळे बटाटा लागवडीच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे बटाटा उत्पादक शेतकरी बोलून दाखवत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सातगाव पठार भागातील पारगाव तर्फे खेड, पेठ, कारेगाव, भावडी, थुगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी आदी भागात दरवर्षी खरीप हंगामात सुमारे नऊ ते दहा हजार एकर शेतीक्षेत्रात बटाटा पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र चालू हंगामात जवळपास 20 टक्के इतके बटाटा लागवडीचे क्षेत्र घटले असून ते आता सात ते आठ हजार एकर ऐवढ्याच क्षेत्रावर बटाटा लागवड कऱण्यात आली आहे. 

सुमारे दोन हजार एकर शेती क्षेत्रावर लागवड न झाल्याने उत्पादन घटणार असून याचा फटका शेतकऱ्यांना तसेच खाणारांनाही बसणार आहे. लागवड करण्यात आलेल्या बियाणांत प्रामुख्याने वेफर्ससाठी वापरण्यात येणाऱ्या 15-33, ए.टी.एल, एफसी-3, तसेच खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्योती या वाणांची लागवड करण्यात आलेली आहे. सध्या लागवड केलेले बटाटा पिक चांगल्या अवस्थेत आहे. 

खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा 

लागवडक्षेत्र घटण्याची मुख्य कारणे –
1.    बटाटा बियाणांचे वाढलेले बाजारभाव
2.    बटाटा बियाणांची कमतरता
3.    भांडवली खर्चात झालेली दरवाढ
4.    बाजारभावाची शाश्वती नाही
5.    पावसाची शाश्वती नाही
6.    बटाटा काढणीसाठी कोरोनामुळे मजूर मिळतील की नाही याची चिंता
7.    मागील दोन वर्षे शेतीत अपेक्षित नफा शेतकऱ्यांना मिळाला नाही.

''सध्या सातगाव पठारावरील बटाटा पिक चांगले बहरले असून उत्पादनही चांगले निघणार असल्याचा अंदाज आहे. मात्र काही ठिकाणी जेथे जास्त पाऊस झाला आहे तेथे या पिकाचा दांडे सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तेवढ्या भागातील शेतकऱ्यांना उत्पादनाचा फटका बसू शकतो. शेतकऱ्यांना काही ना काही कारणाने असा फटका नेहमीच बसत असतो त्यामुळे शासनाने बटाटा पिकाला पिक विम्याचे कवच द्यावे ही बटाटा उत्पादक शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे, ती पूर्ण झाली पाहिजे.''
- अशोक बाजारे, बटाटा उत्पादक शेतकरी, भावडी, ता.आंबेगाव.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
''बटाटा बियाणांची कमतरता तसेच वाढलेले बाजारभाव आणि महत्वाचे म्हणजे सध्या कोरोनाचे मोठे संकट सतावत आहे. बटाटा काढणीसाठी मोठ्या प्रामाणावर मजूरांची गरज असते. मात्र कोरोनामुळे बटाटा काढणीसाठी मजूर मिळतील की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या सर्व कारणांमुळे सातगाव पठारावरील बटाटा शेतीचे नेहमीपेक्षा 20 टक्के क्षेत्र घटले आहे.''
- राम तोडकर, बटाटा उत्पादक शेतकरी व हुंडेकरी व्यवसायीक, पेठ ता.आंबेगाव
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com