esakal | पुणे जिल्ह्याला आज ‘यलो अलर्ट’
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain Raincoat Umbrella IMD Maharashtra

पुणेकरांनो, रेनकोट-छत्री सोबत ठेवा; जिल्ह्याला आज ‘यलो अलर्ट’

sakal_logo
By
सकाळ वृत्तेसवा

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात सोमवारी (ता. ३) दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला सोमवारी ‘यलो अलर्ट’ दिल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली.

शहरात रविवारी दुपारनंतर वेगाने वातावरणात बदल झाला. अकाश काळ्या ढगांनी पूर्ण व्यापले. सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि पाठोपाठ ढगांचा गडगडाट होऊ लागला.

हेही वाचा: Success Story : कोरोना काळात कडू कारले ठरतेय गोड

सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रज, कोथरूड, पाषाण या भागात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. मंगळवारी (ता. ४) दुपारपर्यंत आकाश निरभ्र राहील. संध्याकाळी अंशतः ढगाळ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारपासून (ता. ५) ते शनिवारपर्यंत (ता. ८) ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडतील.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image