
Success Story : कोरोना काळात कडू कारले ठरतेय गोड
आंबेठाण : एकीकडे कोरोना महामारीने सर्वसामान्य नागरिकांसह जागतिक अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असताना प्रचंड जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे सध्याच्या बिकट परिस्थितीत उत्पन्नांचा आर्थिक स्तोत्र सुरू ठेवण्याचा प्रयत्न रोहकल(ता.खेड) येथील चंद्रकांत गणपत ठोंबरे या शेतकऱ्याने केला आहे.अवघ्या सात गुंठे क्षेत्रात केवळ साडेतीन महिन्यात जवळपास दोन लाख रुपयांच्या कारल्याचे पीक घेऊन कडू कारले गोड केले आहे.
पाण्याची फारशी सुविधा उपलब्ध नसताना कूपनलिकेच्या पाण्यावर आधुनिक पद्धतीचा म्हणजे मल्चिंग पेपर वापरून त्याला ठिबक सिंचनाची जोड देऊन कमी पाण्यावर शेती करण्याचा प्रयत्न केला आहे. या पिकासाठी ९० टक्के सेंद्रिय खते आणि केवळ दहा टक्के रासायनिक खताचा वापर करून अवघ्या काही दिवसांत लाखोंची उलाढाल केली आहे.
हेही वाचा: पुणेकरांनो, रेनकोट-छत्री सोबत ठेवा; जिल्ह्याला आज ‘यलो अलर्ट’
सध्या या सात गुंठ्यातून जवळपास ९० हजारांचे कारले पिकाचे उत्पन्न घेतले असून अजून जवळपास एक ते दीड लाख रुपयांचा माल निघेल अशी परिस्थिती आहे. सध्या ठोक मध्ये कारल्याला ३५ ते ४५ रुपयांचा भाव असून हा भाव किरकोळ बाजारात ८० रुपये किलोपर्यंत जातो.
सध्या कारले पिक घेताना आधुनिक पद्धतीने जाळी वापरून पिक घेतले गेल्याने मालाचे नुकसान होत नसून उतारा चांगला मिळत असल्याचे चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितले. या सात गुंठ्याच्या क्षेत्रातून सुरुवातीला साडे तीन महिने कारले पिक,त्यानंतर तीन महिने काकडी पिक आणि त्यानंतर भाताचे पिक अशी पिके घेतली जातात.याशिवाय आंतर पिक म्हणून मिरची,घोसाळी,काकडी अशी पिके सध्या घेतली गेली आहेत.
हेही वाचा: पुण्यात आज लसीकरण नाही!
वयाच्या साठाव्या वर्षी कोरोना सारख्या आजारावर यशस्वीपणे मात करून त्यांची पत्नी सीताबाई चंद्रकांत ठोंबरे या शेती कामात पतीला हातभार लावत असतात. तर त्यांचा मुलगा प्रकाश हा शेतमालाच्या विक्री व्यवस्थापनाचे आणि शेतात तांत्रिक सहाय्य करण्याचे काम करतात.
अवकाळीचा आणि लॉकडाऊनचा फटका
सध्या अवकाळी पाऊस पडत असल्याने पाऊस आणि त्यात होणारी गारपिट याचा फटका पिकाला बसला असून नुकसान झाले आहे.याशिवाय बहुतांश ठिकाणी लॉकडाऊनमुळे बाजार बंद असल्याने बाजारपेठ उपलब्ध होत नाही परंतु माल मोठ्या प्रमाणात निघत असल्याने आणि बाजार चांगला मिळत असल्याने ही तूट भरून निघत आहे.
Web Title: Chandrakant Thombare From Rohakal Khed Earned Income In 3 And Half Month In The Bitter Gourd Worth Rs 2
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..