
Yerwada-Katraj Tunnel Plan Rejected: PMC Declares It Unviable
Sakal
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मांडलेला येरवडा ते कात्रज या दरम्यानचा बोगदा व्यवहार्य नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. ‘येरवडा ते कात्रज दरम्यानचा बोगदा व्यवहार्य नाही. बोगद्याची उपयुक्तता व खर्चही परवडणारा नाही. त्यामुळे बोगद्याच्या कामाला आमचा विरोध आहे,’ असे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी मंगळवारी स्पष्ट केले.