Pune Fraud News : मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख वाढवून येरवड्यातील महिलेची २६ लाख ५० हजार रुपयांची केली फसवणूक; आरोपीवर ११ ठिकाणी गुन्हे दाखल

मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत येरवड्यातील एका महिलेची २६ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे आले समोर.
Matrimonial Site Fraud

Matrimonial Site Fraud

sakal

Updated on

पुणे : मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत येरवड्यातील एका महिलेची २६ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. स्वप्नील वारुळे उर्फ आदर्श प्रशांत म्हात्रे (वय-३४, रा. अलिबाग, जि. रायगड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अशाच प्रकारे त्याने आता पर्यंत ११ महिलांना फसविले असून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणुकीचे तब्बल ११ गुन्हे दाखल असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com