
पुणे : येरवडा येथील समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे विश्रांतवाडी येथे अचानक स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ‘हा निर्णय अन्यायकारक असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी थट्टा करणारा आहे,’’ अशा तीव्र प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.