
Yerwada immersion ghat issue
esakal
विश्रांतवाडी : गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, याकरिता शहर, उपनगरांतील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नदीकाठावरील विसर्जन घाटांच्या दुरुस्तीसह तेथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामांसाठी महापालिकेकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु येरवडा येथील श्री सावता माळी विसर्जन घाटाची दुरवस्था पाहता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कामे झाली नसल्याचे दिसून आले. येथील गैरकारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी करीत येरवडा एकीकरण समितीतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले.