येरवड्यात आळंदी रस्त्यावर काटेरी बाभळी व झाडे-झुडपामुळे विद्रुपिकरणात भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येरवड्यात आळंदी रस्त्यावर काटेरी बाभळी व झाडे-झुडपामुळे विद्रुपिकरणात भर

येरवड्यात आळंदी रस्त्यावर काटेरी बाभळी व झाडे-झुडपामुळे विद्रुपिकरणात भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोहगाव - पुणे शहरात एक अत्यंत महत्वाचा असलेल्या आळंदी रस्त्यावर येरवड्यातील आंबेडकर सोसायटी ते शांतीनगर दरम्यान पदपथाच्या कडेला गवत, झाडीझुडपे व काटेरी बाभळी वाढल्या आहेत.

येरवड्यातील डेक्कन कॉलेज ते म्हस्केवस्तीदरम्यान असलेला सुमारे दोनशे फूट रुंदीचा आळंदी रस्ता, हा शहरातील अथवा पुणे शहराच्या उपनगरातील एक अत्यंत महत्वाचा आणि वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर दिवसरात्र मोठी वाहतूक सुरू असते. या रस्त्याच्या सौंदरीकरणासाठी महापालिकेकडून रस्त्याच्या दुतर्फा अनेक वर्षांपूर्वी शोभेच्या झाडांचे रोपण करण्यात आले असून यातील बरीचशी झाडे अगदी दहा-बारा फूट उंचावली आहेत.

मात्र, अनेक ठिकाणी काटेरी झाडेझुडपे व बाभळी वाढल्याने रस्त्याचे विद्रुपीकरण होत आहे. आळंदी रस्त्यासारख्या महत्वाच्या व मुख्य रस्त्याबाबत अशी परिस्थिती असेल, तर मग इतर अंतर्गत रस्त्यांची काय परिस्थिती असावी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना उद्यान विभागाचे वृक्ष निरीक्षक राजेश चिवे म्हणाले, दोन दिवसात आळंदी रस्त्यावरील झाडेझुडपे, गवत व काटेरी बाभळी काढून टाकण्यात येतील.

loading image
go to top