कोरोनाच्या लढाईत आता प्रवाशांच्या व्यवस्थापनासाठी उतरलयं "योद्धा परिवर्तन'  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yoddha p.jpg

कोडराइझ टेक्‍नॉलॉजीकडून "अॅप' विकसित; कोरोना व्यवस्थापनात करणार मदत 

कोरोनाच्या लढाईत आता प्रवाशांच्या व्यवस्थापनासाठी उतरलयं "योद्धा परिवर्तन' 

पुणे : कोरोनाच्या कालखंडात प्रवाशांच्या योग्य व्यवस्थापनासाठी पुण्यातील युवा अभियंत्यांनी "योद्धा परिवर्तन' हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. विशेष म्हणजे याचा डॅशबोर्ड प्रशासन किंवा संबंधित "एनजीओ'ला वापरता येणार असून, नागरिकांसाठी हे अॅप मोफत उपलब्ध असेल. 

- पुणेकर खवय्यांसाठी 'थोडी खुशी थोडा गम'; वाचा महत्त्वाची बातमी

कोडराइझ टेक्‍नॉलॉजीचे सहसंस्थापक निलेश शिनोलीकर म्हणाले,""इनपुट, प्लान आणि रिस्पॉन्स अशा त्रिसूत्रीवर आधारित आमचे हे अॅप नागरिकांसह प्रशासनाला प्रवाशांच्या व्यवस्थापनात खूप उपयोगी पडणार आहे. प्रवाशांच्या माहितीबरोबरच त्यांच्या विलगीकरणासह, प्रवासाची योग्य व्यवस्था झाली की नाही, याची खात्री दोघांनाही करता येणार आहे. यामुळे प्रशासनाला मदत तर होईल, पण त्याचबरोबर नागरिकांना प्रवासासाठीचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही.

- पुणे पोलिसांचा 'तो' उपक्रम भविष्यातही सुरू ठेवा; गृहमंत्र्यांनी केल्या सूचना

'' शिनोलीकर यांच्यासोबत प्रशांत सिंग यांनीही मोलाची जबाबदारी पार पाडली. सध्या लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर गावाकडे परतणाऱ्या नागरिकांना प्रवास आणि विलगीकरणाबद्दल निश्‍चित माहिती मिळत नाही. तसेच आपली जाण्याची व्यवस्था नक्की केव्हा होणार याबद्दल ते अनभिज्ञ असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनस्तापाला सामोरे जावे लागते. गुगल प्ले स्टोअर yoddhaparivartan.coderize.in या नावाने हे अॅप उपलब्ध आहे. 

योद्धा परिवर्तनची वैशिष्ट्ये 
- प्रवासी, त्याच्या निघण्याचे ठिकाण आणि पोचण्याच्या ठिकाणाचे प्रशासन यात समन्वय 
- निघण्याची परवानगी आणि व्यवस्था झाली आहे का नाही याचे अपडेट मिळणार 
- तसेच गावाकडील प्रशासनाची परवानगी आणि गरज असल्यास विलगीकरणाची व्यवस्थाही कळणार 

फायदे 
- राष्ट्रीय स्तरावरील प्रवाशांचे व्यवस्थापन शक्‍य 
- प्रशासनाला डॅशबोर्डमुळे नागरिकांची इत्थंभूत माहिती मिळणार 
- प्रवासाबरोबरच इतर व्यवस्थांची खात्री मिळणार 
- दीर्घकाळासाठी उपयोगात आणता येईल 

 

योद्धा परिवर्तन हे ऍप प्रत्यक्ष नागरिकांच्या उपयोगात यावे म्हणून आम्ही प्रशासनाशी संपर्कात आहे. कोरोनाच्या काळात प्रशासनाला योग्य ती मदत आमच्या परीने करण्याचा हा प्रयत्न आहे. आम्हाला खात्री आहे की या अॅपमुळे राष्ट्रीय स्तरावर प्रवाशांचे व्यवस्थापन करणे सहज शक्‍य होईल. 
- निलेश शिनोलीकर, सहसंस्थापक, कोडराईझ. 
 

Web Title: Yoddhaparivartancoderizein Passenger Management

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top