esakal | निरोगी आयुष्यासाठी योगा आवश्यक; जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga is essential for a healthy life

बदलत्या जीवनशैलीमुळे रक्तदाब, मधुमेह तसेच हृदयरोग या सारख्या आजारांनी समाजाला ग्रासले आहे. यावर एक पूरक उपचार पद्धती म्हणून योगाकडे पाहिले जात असून, त्याचे जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, असे मत योगा विथ चिन्मयी संस्थेच्या संचालिका चिन्मयी नगरकर यांनी व्यक्त केले.

निरोगी आयुष्यासाठी योगा आवश्यक; जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे रक्तदाब, मधुमेह तसेच हृदयरोग या सारख्या आजारांनी समाजाला ग्रासले आहे. यावर एक पूरक उपचार पद्धती म्हणून योगाकडे पाहिले जात असून, त्याचे जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, असे मत योगा विथ चिन्मयी संस्थेच्या संचालिका चिन्मयी नगरकर यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

संस्थेच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त महिलांसाठी खास ऑनलाईन योगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महिलांचे मार्गदर्शन करत त्या बोलत होत्या. तसेच यावेळी त्यांनी विविध योगासन प्रकार, त्यामुळे होणाऱ्या लाभाची माहिती देऊन प्रात्यक्षिके सादर केली.
-----------
अखेर चीनकडून सैन्य मारले गेल्याची कबुली
-----------
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एच१बी व्हिसाबाबात मोठा निर्णय; भारतियांना झटका
-----------
महिलांमध्ये होणारी गुडघेदुखी, कंबरदुखी, ओटीपोटाचे विकार, मानसिक आजार, नैराश्यासारख्या आजारांमध्ये विविध आसने उपयोगी ठरली आहेत, असेही नगरकर यांनी नमूद केले. या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये 16 वर्षापासून ते 70 वयोगटाच्या महिलांनी सहभाग नोंदविला होता.

loading image