Yogesh Tilekar is confident being he elected from Hadapsar Vidhansabha seat
Yogesh Tilekar is confident being he elected from Hadapsar Vidhansabha seat

Vidhan Sabha 2019 : हडपसर हा महायुतीचाच बालेकिल्ला : आमदार टिळेकर

(कोंढवा) पुणे :  हडपसर मतदार संघातील बहुजन समाजातून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांचा उत्साह वाढत चालला आहे. सर्वच स्तरातील समाज घटकांकडून त्यांना प्रोत्साहन मिळत असल्याने हा मतदारसंघ महायुतीचाच बालेकिल्ला असल्याचा आत्मविश्वास टिळेकर यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. 

भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारार्थ आज कात्रज कोंवा रोड परिसरासह प्रभाग क्रमांक 41 मधील साई नगर, गोकुळ नगर, टिळेकर नगर, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, काकडे वस्ती आदी भागातून पदयात्रा काढली होती. त्यांनी यावेळी मतदार व नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. या भेटीत नागरिकांनी त्यांचे अपेक्षापेक्षाही अधिक पटीने जोरदार स्वागत केले.

आमदार टिळेकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दुतर्फा गर्जत होत्या. त्यावेळी हर्षोल्हासित झालेल्या टिळेकर यांनी बालेकिल्ल्याबाबतचा आत्मविश्वास व्यक्त केला. पदयात्रेमध्ये जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, गणेश कामठे, नगरसेविका रंजना टिळेकर, वृषाली कामठे, वीरसेन जगताप, पालिकेतील स्वीकृत सदस्य सतीश मार्कड पाटील, अनिल येवले, तुषार कदम, प्रभाग अध्यक्ष संभाजी कामठे, सुनील कामठे, राहुल टिळेकर, भरत टिळेकर, हरीश टिळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी घरोघर महिलांनी टिळेकर यांचे औक्षण करून तर तरुणांनी घोषणा देत स्वागत केले. मिळत असलेला भरघोस प्रतिसाद पाहून भारावलेल्या टिळेकर यांनी ज्येष्ठांना अभिवादन करीत मतदानाचे आवाहन केले. "कोंढवा भागाने मला व माझ्या कुटुंबाला कायमच मायेचा आधार दिला आहे. त्यांच्या प्रेम व आपुलकी मुळेच मी आतापर्यंत यशस्वी झालो आहे. हाच आशीर्वाद आता संपूर्ण हडपसर मतदारसंघातून मला मिळेल, आणि निश्‍चितपणे पुन्हा मला या भागाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल, असा विश्वास आमदार योगेश टिलेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com