कोरोनाग्रस्तांसाठी सरसावले भोरवासिय; रुग्णांना 'या' सेवा पुरवणार मोफत!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

मंडळामार्फत कोविड सेंटरमध्ये मदतीसाठी दोन-तीन कर्मचाऱ्यांना नेमण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना पीपीई कीट आणि मानधनही मंडळामार्फत दिले जाणार आहे.​

भोर (पुणे) : कोरोनाग्रस्तांसाठी शहरातील मूक-बधीर विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील सुविधांसाठी भोरवासिय सरसावले आहेत. अनेकांनी प्रशासनास मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. शहरातील मंगळवार पेठेतील सुभाष तरुण मंडळ आणि व्यापाऱ्यांनी याबाबत नियोजन केले असल्याचे मंडळाचे सदस्य प्रमोद गुजर यांनी सांगितले.

...म्हणून विद्यार्थ्यांनं शिक्षकांना पाठवलं पत्र!​

सुभाष तरुण मंडळाचे अध्यक्ष संजय वनारसे आणि उदय गुठाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने सर्व कोरोनाग्रस्तांच्या जेवणाच्या पॅकींगचे कंटेनर (यूज अँड थ्रो) देण्यात येणार आहेत. यामुळे अन्नाची नासाडी होणार नाही आणि रुग्णांनाही व्यवस्थितपणे जेवण करता येऊन अस्वच्छता होणार नाही.

याशिवाय मंडळामार्फत कोविड सेंटरमध्ये मदतीसाठी दोन-तीन कर्मचाऱ्यांना नेमण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना पीपीई कीट आणि मानधनही मंडळामार्फत दिले जाणार आहे. रुग्णांना वाफ घेण्यासाठी १० स्टीमर देण्यात देण्यात येणार आहेत. मंडळामार्फत या उपक्रमाचे नियोजन शरद जाधव करणार आहेत. शहरातील सलीम केबलतर्फे कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी केबलची मोफत सोय करून देण्यात येणार आहे.

चिदंबरम यांच्या केंद्र सरकारला सूचना; सरकार अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणार?​

कोविड सेंटरमध्ये वृत्तपत्रेही मोफत मिळणार
भोर तालुका पत्रकार संघाच्यावतीने मूक-बधीर विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना वाचण्यासाठी सर्व वृत्तपत्रे मोफत देण्यात येणार आहेत. सेंटरमध्ये दररोज सकाळ, लोकमत, पुढारी, प्रभात, पुण्यनगरी, केसरी, महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्ता आदी वृत्तपत्रे ठेवण्यात येणार आहेत. यासाठी विजय जाधव, सूर्यकांत किंद्रे, चंद्रकांत जाधव, भुजंगराव दाभाडे, संतोष म्हस्के, सारंग शेटे, निलेश खरमरे, अर्जुन खोपडे, स्वप्निल पैलवान, पुरुषोत्तम मुसळे आणि इम्रान आतार आदी सदस्य सहकार्य करणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young activists and traders in Bhor will provide various services to Corona patients free of cost