esakal | चिदंबरम यांच्या केंद्र सरकारला सूचना; सरकार अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणार?
sakal

बोलून बातमी शोधा

P_Chidambaram

पायाभूत सुविधांवरील खर्च वाढवण्याबरोबरच राज्यांना वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरपाई देण्याची त्यांनी मागणी केली.

चिदंबरम यांच्या केंद्र सरकारला सूचना; सरकार अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणार?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम (P.Chidambaram) यांनी रविवारी (ता.६) सरकारला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी कर्ज (Loan) घेण्याची सूचना केली. चिदंबरम यांनी एफआरबीएम मानदंडात सुलभता, निर्गुंतवणुकीत गती वाढविणे आणि जागतिक बँकांकडून पैसे उधार घेणे यासह निधी उभारण्याचे काही मार्ग सुचविले आहेत.

'संविधानाचे रक्षक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशवानंद भारती यांचे निधन

अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून त्यांनी ५० टक्के गरीब कुटुंबांना रोख रकमेचे हस्तांतरण करणे, त्यांना धान्य उपलब्ध करून देणे आणि पायाभूत सुविधांवरील खर्च वाढवण्याबरोबरच राज्यांना वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरपाई देण्याची त्यांनी मागणी केली.

- Covid-19: भारताने ब्राझीलला टाकले मागे; आता फक्त अमेरिका आपल्या पुढे

चिदंबरम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ''मागणी आणि वापर वाढविण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, सर्वात गरीब अशा ५० टक्के कुटुंबांना काही रोख रक्कम हस्तांतरित करण्यासाठी काही ठोस पावले उचलली जाऊ शकतात. अशा सर्व कुटुंबांना आवश्यक ते अन्न द्या, पायाभूत प्रकल्पांवर खर्च वाढवा, मोठ्या सार्वजनिक प्रकल्पांची कामे सुरू करा, तसेच बँकांना पुन्हा पुनर्पूंजीकरण (रिकॅपिटलायझेशन) करा, जेणेकरून बँका जास्त कर्ज देऊ शकतील आणि राज्यांच्या जीएसटीची भरपाई होईल. सध्या सर्वांना पैशांची गरज आहे, त्यामुळे कर्ज घ्या, अजिबात संकोच करू नका.''

...म्हणून विद्यार्थ्यांनं शिक्षकांना पाठवलं पत्र!​

चिदंबरम यांनी पुढे सुचविले की, "निधी उभारण्यासाठी काही ठोस पावले अशा प्रकारची असू शकतात. एफआरबीएमच्या तरतुदी आणखी सुलभ करा आणि या वर्षी अधिक कर्ज काढा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आशियाई विकास बँक इ. ठिकाणच्या ६.५ अब्ज डॉलर्स ऑफरचा वापर करा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited By : Ashish N. Kadam)