'मला इंजिनिअरिंग करायचे नव्हते...सॉरी; वडिलांना मेसेज करुन तो...

A Young Boy left after sending sorry message to father at Pune
A Young Boy left after sending sorry message to father at Pune

वाघोली (पुणे) : ''मी चाललो. मला इंजिनीरिंग कधीच करायचे नव्हते. मी प्रयत्न केले. मला जमले नाही. मी काही तरी करेन आणि मग परत येईल. सॉरी'', असा मेसेज करून 20 वर्षीय तरुण संकेत सतीश देशमुख हा शुक्रवारी(ता. 3) निघून गेला. त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या परत येण्याकडे ते वाट लावून बसले आहेत.

पॅनिक बटन ऑन होल्ड; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

मूळचा अकोला येथील संकेत तळेगाव अंबी येथील डी वाय पाटील इंजिनीरिंग कॉलेजमध्ये तीन वर्षांपासून शिकत होता. तो 26 डिसेंबरला आपल्या बहिणीकडे रावेत येथे गेला. तिथे त्याने एक दिवस मुक्काम केला. यानंतर दुसऱ्या दिवशी वसतिगृहात जातो असे सांगून तो तेथून निघाला. तो वसतिगृहात गेलाच नाही. मात्र, त्यानंतर तो आठ दिवस मोबाईलवरून आपल्या वडिलांच्या संपर्कात होता.

पुण्यातील व्यवसायिकाचे 2 कोटीसाठी अपहरण; साताऱ्यात गोळी घालून खून

शुक्रवारी (ता.3) त्याने वडिलांना, ''मला इंजिनीरिंग कधीच करायचे नव्हते. मी प्रयत्न केले. मला जमले नाही. मी काही तरी करेन आणि मग परत येईल. सॉरी'', असा मेसेज केला. त्यानंतर त्याने मोबाईल स्वीच ऑफ केला. हा मेसेज वाचल्यानंतर त्यानी त्याला खूप संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, झाला नाही. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे स्टेशन येथील होते. या प्रकरणी त्याचे वडील सतीश भालचंद्र देशमुख ( वय 52, रा अकोला) यांनी पोलिसात हरवल्याची फिर्याद दिली. त्याच्या परत येण्याकडे ते वाट लावून बसले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com