पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

पुणे : कोंढवा पोस्ट हद्दीमध्ये लेप्रसी हॉस्पिटलजवळील धोबी घाट येथे अक्षय उर्फ बंटी गायकवाड (वय  ३०, रा. येवलेवाडी) याचा लाकडाची दांडके व दगड वापर करून खून करण्यात आलेला आहे.

पुणे : कोंढवा पोस्ट हद्दीमध्ये लेप्रसी हॉस्पिटलजवळील धोबी घाट येथे अक्षय उर्फ बंटी गायकवाड (वय  ३०, रा. येवलेवाडी) याचा लाकडाची दांडके व दगड वापर करून खून करण्यात आलेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोंढवा भागात रक्ताच्या थारोळ्या तरुण आढळल्याची माहिती शनिवारी सकाळी समोर आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासा दरम्यान, मृत तरुणाचे नाव बंटी गायकवाड असल्याचे समोर आले. बंडी गायकवाड यास अज्ञात इसमांनी काल रात्री  बंदोरवालासरकारी कुष्ठरोग रूग्णालयात आवारात दगडाने ठेचून मारले.

पुण्यात मेट्रोच्या कामाची धडकी; वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव मुठीत 

पुर्ववैमन्स्यातून खून झाल्याची शक्यता पोलिसांना वर्तविली असून आरोपी अद्याप अज्ञात आहेत. कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड  करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Young Boy Murdered in kondhawa pune