'आईची काळजी घ्या'; मेसेज करून खडकवासला धरणात व्यावसायिकानं संपवलं जीवन

'आईची काळजी घ्या'; मेसेज करून खडकवासला धरणात व्यावसायिकानं संपवलं जीवन

किरकटवाडी(Pune): 'माझ्या आईची काळजी घ्या', असा व्हॉइस मेसेज आपल्या चुलत भावाला पाठवून एका तरुण व्यावसायिकाने(Businessman) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुणे-पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरणाच्या (Khadakwsla Dam) भिंतीजवळ पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. आज आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाचा मृतदेह(Deadbody) पाण्यावर तरंगताना आढळून आला.(Young businessman commits suicide by jumping into Khadakwasla dam)

चंद्रशेखर गोपाळ पुजारी (वय 31, रा. सोमवार पेठ, पुणे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सोमवार पेठ येथे हातगाडीवर वडापाव व डोसा विक्रीचा त्याचा व्यवसाय होता. गुरवारी (ता 6) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सदर तरुण खडकवासला धरणाजवळ आला होता. तेथून त्याने त्याच्या चुलत भावाला,"माझी गाडी खडकवासला धरणाजवळ लावलेली आहे. मी आत्महत्या करत आहे. माझ्या आईची काळजी घ्या. गाडी विकून जे पैसे येतील ते माझ्या आईला द्या," असा व्हॉइस मेसेज केला.

'आईची काळजी घ्या'; मेसेज करून खडकवासला धरणात व्यावसायिकानं संपवलं जीवन
सलाम! आतापर्यंत एक कोटी लोकांना दिलं मोफत जेवण

चुलत भाऊ व नातेवाईकांनी तातडीने खडकवासला येथे येऊन शोधाशोध केली असता चंद्रशेखर पुजारी याची दुचाकी आढळून आली. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्याच्या गाडीतळ चौकीमध्ये चंद्रशेखर हरवला असल्याची तक्रार नातेवाईकांकडून दाखल करण्यात आली होती. आज (ता. 7 ) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणाच्या भिंतीजवळ रस्त्याला लागून एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती स्थानिकांनी हवेली पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला.

हवेली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस उपाधीक्षक राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, पोलीस हवालदार रामदास बाबर, दिलीप गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून फरासखाना पोलिस ठाण्याकडून पुढील तपास केला जात आहे.

'आईची काळजी घ्या'; मेसेज करून खडकवासला धरणात व्यावसायिकानं संपवलं जीवन
पक्षातील 'दादां'ऐवजी विरोधक 'दादा' बरा

तरुणाची पार्श्वभूमी गुन्हेगारीची......

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर पुजारी हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला होता. त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, धमकावणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या मात्र तो गुन्हेगारी सोडून व्यवसाय करत होता.

आयपीएलवर सट्टेबाजी व व्याजाचाही धंदा.....

चंद्रशेखर पुजारी याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ''तो आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावत होता. तसेच परिसरातील व्यावसायिक व नागरिकांना लहान-मोठ्या प्रमाणात व्याजाने पैसे देण्याचा धंदाही करत होता. त्यामुळे कर्जबाजारीपणातून चंद्रशेखर याने आत्महत्या केली की इतर काही कारणे होती हे पोलीस तपासातून स्पष्ट होईल.''

'आईची काळजी घ्या'; मेसेज करून खडकवासला धरणात व्यावसायिकानं संपवलं जीवन
आईने बाळाला दिला पुनर्जन्म

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com