
त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या : तरुणास अटक
वेल्हे, (पुणे) - राजगड खोऱ्यातील लव्ही बुद्रुक (ता. वेल्हे ) येथे तरुणाच्या त्रासाला कंटाळून युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सानीका संतोष रेणुसे ( वय १९ ) असे मयत युवतीचे नाव आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी अविनाश मारुती रेणुसे ( वय १९) अटक केली असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व पोलीस उपनिरीक्षक महेश कदम तपास करत आहेत.
याबाबत मयत सानिका हिचे वडील संजय उर्फ संतोष लक्ष्मण रेणुसे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी- अविनाश रेणुसे याच्या विरुद्ध सोमवार ( दि. २३) भादवी ३०६ कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ( दि. १५) रोजी सकाळी १० ते ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान लव्ही बुद्रुक येथे घडला.आरोपी अविनाश याने सानिका हिला मोबाईल फोन वरुन अपशब्दात वाद घातला. दोघांत जोर जोरात वाद घातला होता. सानिका हि तु मला त्रास देऊ नको. असे म्हणत घराचे पाठीमागील बाजूच्या पडवीत गेली. तेथे छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. असे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.
Web Title: Young Girl Commits Suicide Due Bothretion Youth Arrested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..