विवाहास नकार दिल्याने संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide

विवाह नोंदणीविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून संगणक अभियंता असलेल्या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून फसवणुक केल्याने तरुणीने विष घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

विवाहास नकार दिल्याने संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या

पुणे - विवाह नोंदणीविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून संगणक अभियंता असलेल्या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून फसवणुक केल्याने तरुणीने विष घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना धानोरी येथे घडली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात मुंबईतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शंतनू संजय साळुंखे (रा. हेरंब को-ऑप सोसायटी, टिळकनगर, कुर्ला, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीच्या भावाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन साळुंखेविरुद्ध फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे व बलात्कार अशा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुर्योधन भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीची 31 वर्षीय बहिण एका नामांकीत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत होती.

दरम्यान, तरुणीची शंतनू साळुंखे याच्यासमवेत विवाह नोंदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, तरुणीने त्याच्याकडे लग्न करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र त्याने नकार दिला. तरुणीच्या वडीलांना भावासमवेत बालाजी येथे दर्शनासाठी जायचे असल्याने तिने 27 ऑगस्ट रोजी वडीलांना पुनावळे येथे राहणाऱ्या तिच्या भावकडे नेऊन सोडले. त्यानंतर तिने त्याच दिवशी घरामध्ये विष घेतले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला त्रास होऊ लागल्याने तिने भावाला बोलावून घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी तिला ससून रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु असतानाच 29 ऑगस्ट रोजी तिचा मृत्यु झाला. त्यानंतर याबाबतची सर्व माहिती पोलिसांना ससून रुग्णालयाकडून समजली. त्यानुसार, पोलिसांनी फिर्यादीकडून माहिती घेऊन, तरुणीने मृत्युपुर्वी लिहीलेली चिठ्ठी ताब्यात घेऊन संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Young Girl Computer Engineer Suicide Refusal Of Marriage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..