
पुणे - पैसे देण्यास नकार दिल्यामुळे चोरट्याने एका तरुणाच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार करून पैसे काढून घेतल्याची घटना पुणे रेल्वे स्टेशन परिसरात घडली. या परिसरात चोरट्यांकडून लुटमारीच्या घटना होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.