गळा चिरून घेत टेरेसवरून मारली उडी; विश्रांतवाडी परिसरातील घटना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

विश्रांतवाडी परिसरातील एका तरुणाने धारदार शस्त्राने गळा चिरून अंगावर जखमा करून घेतल्या. मात्र त्यानंतरही जीव जात नसल्यामुळे त्याने दोन मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली.

पुणे : विश्रांतवाडी परिसरातील एका तरुणाने धारदार शस्त्राने गळा चिरून अंगावर जखमा करून घेतल्या. मात्र त्यानंतरही जीव जात नसल्यामुळे त्याने दोन मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राहुल रामा सूर्यवंशी (वय 32, मूळ रा. दगडवाडी, जि. लातूर, सध्या रा. कस्तुरबा सोसायटी, विश्रांतवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी सांगितले की, राहुल नो पार्किंगमधील वाहतुकीच्या गाड्या लोड, अनलोड करण्याचे काम करत होता. तो पत्नीसोबत विश्रांतवाडीत राहात. मात्र लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने तो पत्नीसह गावाला गेला होता. काही दिवसांपूर्वीच काम सुरू झाल्याने तो एकटाच पुण्यात आला होता. रविवारी त्याने राहत्या घरात स्वतःचा गळा चिरून घेत शरीरावर सर्वत्र जखमा करून घेतल्या. तरी देखील जीव जात नसल्याने त्याने इमारतीवरून खाली उडी घेतली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राहुलने आत्महत्या का केली याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी राहुलच्या मोबाईलची तपासणी केल्यावर त्याने आत्महत्या करत असल्याचे रेकॉडिंग केले असल्याचेही आढळून आले आहे.

'तू काळजी करू नकोस पुण्याला ये'
पोलिसांना सुरवातीला हा खुनाचा प्रकार वाटत होता. मात्र जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना राहुलकडे विचारपूस केल्यावर त्याने स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मित्राने त्याचा पत्नीला फोन लावून दिल्यावर "मला किरकोळ जखम झाली आहे, काळजी करू नकोस तू पुण्याला ये' असे राहुलने तिला सांगितले. मात्र कॉल कट केल्यानंतर काही मिनिटांतच त्याने प्राण सोडले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man commits suicide in Pune