रिक्षाच्या धडकेनंतर बसखाली आल्याने तरुणाचा मृत्यू; व्हिडिओ पाहून व्हाल अवाक्

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

भरधाव दुचाकीस्वाराची अचानक समोर आलेल्या रिक्षाला धडक बसली. त्यामुळे दुचाकीस्वार फरफटत रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जात असतानाच तेथून जाणाऱ्या भरधाव बसच्या मध्यभागामध्ये अडकला. त्यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यु झाला. ही घटना रविवारी दुपारी बारा वाजता टिळक रस्त्यावर घडली. 

पुणे : भरधाव दुचाकीस्वाराची अचानक समोर आलेल्या रिक्षाला धडक बसली. त्यामुळे दुचाकीस्वार फरफटत रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जात असतानाच तेथून जाणाऱ्या भरधाव बसच्या मध्यभागामध्ये अडकला. त्यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यु झाला. ही घटना रविवारी दुपारी बारा वाजता टिळक रस्त्यावर घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आकाश तुकाराम विधाते (वय 24, रा. बाणेर) असे या अपघातात मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा त्याच्या स्पोर्टस्‌ बाईकवरून भरधाव वेगात टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेजवळील कशाळे कॉर्नर येथून स्वारगेटच्या दिशेने जात होता. त्याचवेळी अंतर्गत रस्त्यावरुन भरधाव आलेल्या रिक्षाची त्याच्या दुचाकीला धडक बसली. त्यामुळे आकाशची दुचाकी खाली पडली. आकाश दुचाकीसह फरफटत रस्त्याच्या पलिकडील बाजुला जाऊ लागला. त्याचवेळी स्वारगेटहून टिळक चौकाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव पीएमपी बसच्या पुढील दोन्ही चाकांच्या मध्यभागी गेला. त्यामध्ये चाकांमधील बंपरची त्याला जोरदार धडक बसली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

दरम्यान, स्थानिक नागरीकांनी त्यास तत्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केले. मात्र उपचार करण्यापुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले. आकाशने हेल्मेट परिधान केले नव्हते. आकाश हा दुग्ध व्यावसायिक होता. तो त्याच्या वैयक्तीक कामानिमित्त रविवारी दुपारी पुण्यात आला होता. त्याचवेळी हा अपघात घडला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man dies after accident at Tilak Road Pune